भारतीय उद्योजकांना क्रिमियाची साद
By admin | Published: May 15, 2015 12:22 AM2015-05-15T00:22:31+5:302015-05-15T00:22:31+5:30
भारतीय उद्योजकांनी क्रिमियात येऊन आपल्या व्यवसायाचा विस्तार करावा, क्रिमियन सरकार त्यांना सर्व सहकार्य करील, असे आश्वासन रशियातील
विद्या स्वर्गे-मदाने ल्ल सिमफेरोपोल (क्रिमिया, रशिया)
भारतीय उद्योजकांनी क्रिमियात येऊन आपल्या व्यवसायाचा विस्तार करावा, क्रिमियन सरकार त्यांना सर्व सहकार्य करील, असे आश्वासन रशियातील क्रिमियन रिपब्लिकचे पंतप्रधान सर्गेय आक्सियोनोव्ह यांनी केले. ते भारतीय पत्रकारांशी बोलत होते.
क्रिमिया रशियात विलीन झाल्यानंतर आक्सियोनोव्ह यांनी प्रथमच मराठी पत्रकारांशी संवाद साधला. क्रिमियाची लोकसंख्या दोन कोटीपेक्षा जास्त आहे.
रशियात सामील झाल्यानंतर क्रिमियाच्या विकासासाठी रशियन सरकारने मोठी आर्थिक तरतूद केली आहे. त्यातून पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील अशा पायाभूत सुविधा निर्माण करणे, पूल बांधणे, आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधणे आदी गोष्टी करण्यात येणार आहेत, असेही आक्सियोनोव्ह यांनी सांगितले.
भारतीय उद्योजकांनीही क्रिमियात यावे, विशेषत: औषध कंपन्या, मासे प्रक्रिया उद्योग, बंदरांचा पुनर्विकास, पर्यटन कंपन्यांनी पुढाकार घ्यावा असे सुचविले जात आहे. क्रिमियन सरकारने उद्योजकांना विशेष कर सवलती जाहीर केल्या असून, रशियातील इतर भागातील करांपेक्षा द्वीपकल्पावरील कर
कमी असतील. कंपन्यांना विविध परवानग्यांसाठी ह्यएक खिडकी योजनाह्ण सुरू करण्यात आली आहे.