'गुड फ्रायडे'च्या दिवशीच IS करणार भारतीय ख्रिश्चन धर्मगुरूची हत्या?
By admin | Published: March 25, 2016 08:52 AM2016-03-25T08:52:47+5:302016-03-25T08:54:05+5:30
येमेनमधून अपहरण करण्यात आलेल्या भारतीय वंशाच्या ख्रिश्चन धर्मगुरूची (पाद्री) कुख्यात दहशतवादी संघटना इसिस गुड फ्रायडे'च्याच दिवशी हत्या करण्याची शक्यता आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
के लेविस, दि. २५ - येमेनमधून अपहरण करण्यात आलेल्या भारतीय वंशाच्या ख्रिश्चन धर्मगुरूची (पाद्री) कुख्यात दहशतवादी संघटना इसिस ( इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया) आज 'गुड फ्रायडे'च्याच दिवशी हत्या करण्याची शक्यता आहे. येमेनमध्ये राहणा-या ५६ वर्षीय टॉम उझहन्नलिल यांचे ४ मार्च रोजी अपहरण करण्यात आले होते. आणि आजच त्यांची हत्या करण्यात येणार असल्याची भीती ऑनलाइन माध्यमांतून व्यक्त होत आहे. टॉम याच्या अपहरणांतर अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी सोशल मीडियावर त्यांची सुटका करण्याचे आवाहन केले आहे.
मार्च महिन्यात इसिसने येमेनमधील वृद्धाश्रणावर हल्ला करून ४ नन्ससह १६ जणांची हत्या केली होती व त्याचवेळी टॉम यू यांचे अपहरण केले होते. त्यानंतर टॉम यू यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नव्हती. मात्र त्यानंतर काही दिवसांनी काही नन्सनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर एक मेसेज अपलोड केला होता, ज्यात टॉम यांना टॉर्चर करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच 'गुड फ्रायडे'ला त्यांची हत्या करण्यात येईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती.