श्रीलंकेत भारतीय नागरिकाला अटक, अध्यक्षांच्या हत्येच्या कटाची होती माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 04:48 AM2018-09-27T04:48:48+5:302018-09-27T04:49:06+5:30
श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांना ठार मारण्याच्या कटाची कथित माहिती असलेला भारतीय नागरिक एम. थॉमस याला मंगळवारी अटक करण्यात आल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.
कोलंबो - श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांना ठार मारण्याच्या कटाची कथित माहिती असलेला भारतीय नागरिक एम. थॉमस याला मंगळवारी अटक करण्यात आल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.
थॉमस याला भ्रष्टाचारविरोधी चळवळीच्या कारवायांचे संचालक नमल कुमारा यांच्या निवासस्थानाहून अटक केली गेली. कुमारा यांनी हत्येचा कट उघड केला, असे सीआयडीचे मुख्य निरीक्षक रणजीथ मुनासिंघे यांनी फोर्ट मॅजिस्ट्रेट कोर्टाला सांगितले. दंडाधिकारी जयरत्ना यांनी गुन्हे अन्वेषण विभागाला थॉमस याची आणखी चौकशी करून न्यायालयाला त्याचा अहवाल देण्याचा आदेश दिला.
दक्षिण पश्चिम विभागात वराकापोला येथील नमल कुमारा यांच्या घरी थॉमसने भेट दिली तेव्हा त्याला अटक झाली. (वृत्तसंस्था)