भारतीय कंपनीमुळे अमेरिकेत मिळणार १० लाख नाेकऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 10:08 AM2023-02-16T10:08:30+5:302023-02-16T10:08:44+5:30
देशातही वाढणार राेजगार; एअर इंडियाच्या ४७० विमानखरेदीचा लाभ
वाॅशिंग्टन : टाटा समूहाने ४७० विमानांच्या खरेदीसाठी विमान कंपन्यांसाेबत करार केले आहेत. विमान वाहतुकीच्या क्षेत्रातील हा आतापर्यंतची सर्वात माेठा साैदा ठरला आहे. या साैद्यातून अमेरिकेत १० लाखांपेक्षा जास्त नाेकऱ्या निर्माण हाेणार आहेत. जवळपास तेवढ्याच प्रमाणात भारतातही राेजगार निर्माण हाेतील, अशी अपेक्षा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना याबाबत माहिती दिली. दाेन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध यामुळे अधिक घट्ट हाेतील, असे बायडेन यांनी सांगितले.
एअर इंडियाचे टाटा समूहाकडे हस्तांतरण हाेण्यापूर्वी २००५ मध्ये १११ विमानांची खरेदी करण्यात आली हाेती. कंपनी टाटा समुहाच्या ताब्यात आल्यानंतरची ही पहिलीच आणि जम्बाे ऑर्डर आहे. याबाबत माेदी आणि बायडेन यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. दाेन्ही देशांमधील आर्थिक विकासाच्या दृष्टीने दाेन्ही देश सहकार्य वाढवतील, यावर दाेन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली.
राेल्स राॅयस, जीई एराेस्पेसचे इंजिन
nएअरबस ए३५० विमानांमध्ये राेल्स राॅयस या कंपनीचे इंजिन राहणार आहे, तर बाेइंगच्या विमानांमध्ये जीई एराेस्पेस कंपनीचे इंजिन राहणार आहे.
nकंपनीने विमानसेवेच्या फर्म ऑर्डरसह समन्वयाने करार करण्यात आला आहे.
n१९८२पासून जीई एराेस्पेस आणि एअर इंडियाचा संबंध राहिलेला आहे.
nजीई९एक्स हे जगातील सर्वात शक्तिशाली व इंधन-कार्यक्षम इंजिन आहे.
...अशी आहे एअर इंडियाची शाॅपिंग बास्केट
४०० नॅराे बाॅडी विमाने
n१४०-१७० प्रवासी क्षमता
nकमी अंतराच्या प्रवासासाठी याेग्य
७० वाईड बाॅडी विमाने
n३००-४०० प्रवासी क्षमता
nअमेरिकेपर्यंत प्रवास शक्य
भारतातही निर्माण हाेतील राेजगाराच्या संधी
या करारांमुळे भारतातही माेठ्या प्रमाणावर राेजगार निर्माण हाेणार आहेत. जगभरात तसेच देशांतर्गत विमानसेवा वाढणार आहे. त्यासाठी अधिक मनुष्यबळ लागणार आहे. याशिवाय विमानांची देखभाल, ग्राउंड स्टाफ इत्यादी क्षेत्रातही नाेकऱ्या निर्माण हाेतील, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.