भारतीयच तो! फक्त ५ मिनिटांत कोरोनाची 'लिटमस टेस्ट'; संशोधनात दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 04:52 PM2020-12-09T16:52:16+5:302020-12-09T16:53:51+5:30

Corona Virus Test: रसाय़न शास्त्रात लिटमस पेपरला खूप महत्व आहे. असाच एक पेपर भारतीय शास्त्रज्ञाने विकसित केला आहे.

Indian! Corona's litmus test can be in just 5 minutes; Claims in research | भारतीयच तो! फक्त ५ मिनिटांत कोरोनाची 'लिटमस टेस्ट'; संशोधनात दावा

भारतीयच तो! फक्त ५ मिनिटांत कोरोनाची 'लिटमस टेस्ट'; संशोधनात दावा

Next

वॉशिंग्टन : भारतीय वैज्ञानिकाच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या एका टीमने मोठे यश मिळविले आहे. एका कागदाद्वारे कोरोनाची चाचणी करता येणार असून केवळ ५ मिनिटांतच कोरोना पॉझिटीव्ह की निगेटिव्ह आहे, हे समजणार आहे. हा एकप्रकारचा 'लिटमस पेपरच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


रसाय़न शास्त्रात लिटमस पेपरला खूप महत्व आहे. असाच एक पेपर भारतीय शास्त्रज्ञाने विकसित केला आहे. या कागदामध्ये असलेल्या ‘इलेक्ट्रोकेमिकल सेन्सर’चा वापर करणाऱ्या या टेस्टमध्ये केवळ पाच मिनिटांत कोरोना व्हायरसच्या अस्तित्वाची माहिती मिळणार आहे. संशोधकांनुसार ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली तर करोडो लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे. 


अमेरिकेतील इलिनोईस विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी कोरोनाच्या अणुवंशिक कणांच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी एक इलेक्ट्रीकल रीड आऊट सेटअपसोबत ग्राफीन-बेस्ड इलकेबायोसेंसर विकसित केला आहे. ‘एसीएस नैनो’ या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार या बायोसेन्सरमध्ये दोन घटक आहेत. यामध्ये एक ‘इलेक्टोरल रीड-आउट’ मोजण्यासाठी आणि दुसरा व्हायरसच्या आरएनएचा शोध घेण्यासाठी वापरला जातो. 

कसा आहे हा पेपर....
या संशोधनासाठी प्रोफेसर दिपंजन पान यांच्या नेतृत्वाखाली टीम काम करत होती. त्यांनी एक प्रवाहीत फिल्म बनविण्यासाठी ग्रॅफिन नॅनोप्लेटलेट्सची एक पातळ पट्टी फिल्टर पेपरवर लावली. यानंतर त्यांनी इलेक्ट्रीकल रीड आऊटसाठी ग्राफीनच्या पट्टीवर एक सोन्याचा इलेक्ट्रोड बसविला. 
सोने आणि ग्रॅफिनमध्ये मोठ्या प्रमाणावर सेन्सिटिव्हीटी आणि कन्डक्टीव्हीटी असते. याचा फायदा या संशोधनात झाला. हा गुणधर्म विद्युत प्रवाहाच्या संकेतांमध्ये परिवर्तनचा शोध लावण्यासाठी या प्लॅटफॉर्मला अल्ट्रासोनिक बनवितो. या पेपरचा उपयोग केवळ कोरोनाच नाही तर अन्य़ वेगवेगळ्या प्रकारचे आजारांचा शोध लावण्यासाठीही केला जाऊ शकतो, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. 

CoronaVaccine: कोरोना लसीसाठी 'या' अ‍ॅपवर रजिस्टर करावे लागणार

कोरोना व्हायरसची लस लवकरच भारतात दिली जाणार आहे. केंद्राची तातडीने, आपत्कालीन परवानगी मिळविण्यासाठी तीन कंपन्यांनी अर्ज केले आहेत. ब्रिटन, अमेरिका, बहारीन, रशियामध्ये लसीकरणास सुरुवात झाली आहे. यामुळे भारतातही लवकरच लसीकरणाची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. आता ही लस कशी दिली जाणार, कोण कोण लाभार्थी ठरणार, टप्पे, वितरण आदी प्लॅनिंग सुरु असताना अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. अशावेळी सरकारने लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक अ‍ॅप विकसित केले आहे, जे लसीकरणावर नजर ठेवणार आहे. 

Web Title: Indian! Corona's litmus test can be in just 5 minutes; Claims in research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.