झिम्बाब्वेमध्ये भारतीय क्रिकेटपटूला अटक झालेली नाही
By admin | Published: June 19, 2016 03:03 PM2016-06-19T15:03:13+5:302016-06-19T15:32:59+5:30
झिम्बाब्वेमध्ये बलात्काराच्या आरोपाखाली भारतीय क्रिकेटपटूला अटक झाल्याचे वृत्त परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
हरारे, दि. १९ - झिम्बाब्वेमध्ये बलात्काराच्या आरोपाखाली भारतीय क्रिकेटपटूला अटक झाल्याचे वृत्त परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावले आहे. एएनआयने अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने कुठल्याही भारतीय क्रिकेटपटूला अटक झाली नसल्याचे म्हटले आहे.
मालिकेच्या प्रायोजकाशी संबंधित असणा-या भारतीय नागरिकाला अटक झाली आहे. आरोपीने बलात्काराचा आरोप फेटाळला असून, आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी डीएनए चाचणीसाठीही तयार असल्याचे म्हटले आहे.
भारतीय क्रिकेटपटू यामध्ये सहभागी असल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आणि निराधार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. झिम्बाब्वेमधील भारतीय राजदूत या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे.
झिम्बाब्वेच्या प्रसारमाध्यमांनी बलात्काराच्या आरोपाखाली एका क्रिकेटपटूला अटक झाल्याचे वृत्त दिल्यानंतर एकच वादळ निर्माण झाले होते. झिम्बाब्वेतील भारताच्या राजदूतांनी या क्रिकेटपटूची अटक रोखण्याचा प्रयत्न केला, असे वृत्तात म्हटले होते.