दुबई विमानतळांवर आता भारतीय चलनात व्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 05:20 AM2019-07-05T05:20:58+5:302019-07-05T05:25:02+5:30
भारतीय चलन रुपयात आता दुबईतील सगळ्या विमानतळांवर व्यवहार करता येतील. संयुक्त अरब अमिरातीतील प्रमुख दैनिक ‘गल्फ न्यूज’ ने हे वृत्त दिले आहे.
दुबई : भारतीय चलन रुपयात आता दुबईतील सगळ्या विमानतळांवर व्यवहार करता येतील. संयुक्त अरब अमिरातीतील प्रमुख दैनिक ‘गल्फ न्यूज’ ने हे वृत्त दिले आहे.
भारतीय चलन स्वीकारले जाणार ही भारतीय पर्यटकांसाठी चांगली बातमी आहे. आतापर्यंत त्यांनी विनिमय दरांमुळे लक्षणीय रक्कम गमावली आहे, असे सूत्रांनी सांगितले. भारतीय चलन हे आता दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि अल मख्तोम एअरपोर्टवरील तिन्ही टर्मिनल्सवर स्वीकारले जाईल. आम्ही भारतीय रूपया स्वीकारायला सुरवात केली आहे, असे ‘दुबई ड्युटी फ्री’ च्या कर्मचाऱ्याने सांगितले. गेल्या वर्षी दुबई विमानतळांवर जवळपास ९० दशलक्ष प्रवासी आले होते. त्यातील १२.२ दशलक्ष भारतीय होते, वृत्तात म्हटले.
दुबईतील ड्युटी फ्री शॉपमध्ये भारतीयांना खरेदी करायची असायची तेव्हा त्यांना रूपया डॉलर, दिरहॅम किंवा युरोमध्ये बदलून (विनिमय) करून घ्यावा लागायचा. (वृत्तसंस्था)