भारतीय डॉक्टर महिलेला दुबईत 17 कोटींची लॉटरी
By Admin | Published: April 5, 2017 07:05 PM2017-04-05T19:05:54+5:302017-04-05T20:11:30+5:30
"भगवान देता है तो छप्पर फाडके" याचा अनुभव सध्या अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय डॉक्टर महिलेला आला आहे. निशिता राधाकृष्ण पिल्लई असे या डॉक्टर महिलेचं
>ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 5 - "भगवान देता है तो छप्पर फाडके" याचा अनुभव सध्या अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय डॉक्टर महिलेला आला आहे. निशिता राधाकृष्ण पिल्लई असे या डॉक्टर महिलेचं नाव असून तिला दुबई येथील अबू धाबीमधील 17 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे.
निशिता ही मुळची केरळाची असून तिने अबू धाबीमधील लाईफ चेंजिंग लॉटरीच्या बिग तिकीट सोडतीच्या जाहीर झालेल्या निकालात जवळपास 17 कोटी 68 लाख रुपयांचे बक्षिस जिंकले आहे. सध्या निशिता अमेरिकेतील टेक्सॉसमध्ये बालरोगतज्ञ म्हणून कार्यरत आहे. याआधी ती दुबईमध्ये दोन वर्षे होती. गेल्यावर्षी म्हणजेच जुलै महिन्यात निशिता आपल्या फॅमिलीसोबत दुबईहून अमेरिकेला राहायला गेली. मात्र, तिच्या नव-याने दुबईतील या लॉटरीची तिकिटे तिच्या नावाने ऑनलाइन खरेदी केली होती. या लॉटरीत तिने हे बक्षिस जिंकले.
माझा नवरा यूएईचा मोठा फॅन आहे. आम्हाला दुबईत काम केल्याचा आनंद आहे. पुन्हा दुबईत जाण्याचा आमचा प्लॅन असल्याचे निशिताने म्हटले आहे. विशेष म्हणजे ही गोड बातमी माझ्या वडिलांनी पहिल्यांदा सांगितली. त्यावेळी आम्हाला वाटले की, गमतीने कॉल केला असेल. मात्र, त्यांना लॉटरीच्या आयोजकांचा फोन आला होता. यावेळी आम्ही बिग तिकीटच्या वेबसाईटवर पाहून खात्री करुन घेतली, असे निशिताने यावेळी सांगितले. दरम्यान, या जिंकलेल्या पैशांचे काय करायचे, याबाबत अद्याप कोणताही निर्णय निशिता आणि तिच्या नव-याने घेतलेला नाही.
दुबईत लॉटरी जिंकणारी निशिता दुसरी भारतीय आहे. याआधी दुबईत राहणा-या राहणाऱ्या श्रीराज कृष्णन कोप्पोरेम्बिल याला तब्बल 12 कोटी रुपयांची लॉटरी लागली होती. विशेष म्हणजे श्रीराज कृष्णन कोप्पोरेम्बिल हा सुद्धा मुळचा केरळचाच आहे.