इराकमध्येही प्रभू श्रीरामाचं अस्तित्व?; भारतीय संशोधकाचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 12:33 PM2019-06-26T12:33:40+5:302019-06-26T12:35:34+5:30

अयोध्या शोध संस्थानचे निदेशक योगेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, हे हनुमानाचं चित्र आहे. मात्र इराकमधील संशोधकांच्या मते हे चित्र येथील जंगलातील राजा टार्डुनीचं प्रतीक आहे.

Indian embassy tracks mural in iraq cliff ayodhya sodh sansthan said it is lord ram | इराकमध्येही प्रभू श्रीरामाचं अस्तित्व?; भारतीय संशोधकाचा दावा 

इराकमध्येही प्रभू श्रीरामाचं अस्तित्व?; भारतीय संशोधकाचा दावा 

googlenewsNext

लखनऊ - एक भारतीय प्रतिनिधिक मंडळ यावर्षी जूनमध्ये इराकला गेलं होतं. त्याठिकाणी जवळपास 2 हजार वर्षापूर्वीचं भिंतीवरील एक कोरीव चित्र आढळलं आहे. या चित्राबाबत अयोध्येतील शोध संस्थेने दावा केला आहे हे चित्र प्रभू श्रीरामाचं आहे. इराकमधील दरबंद-ई-बेलुला डोंगरामध्ये हे चित्र आढळलं आहे. या चित्रात उघड्या छातीचा राजा दाखविण्यात आला आहे. जो धनुष्यबाण ताणून उभा आहे. तसेच त्याच्या कमरपट्ट्याला छोटी तलवारदेखील आहे. 

या चित्रासोबत आणखी एक चित्र दिसतं त्याबद्दल अयोध्या शोध संस्थानचे निदेशक योगेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, हे हनुमानाचं चित्र आहे. मात्र इराकमधील संशोधकांच्या मते हे चित्र येथील जंगलातील राजा टार्डुनीचं प्रतीक आहे.  इराकमध्ये भारतीय राजदूत प्रदीप सिंह राजपुरोहित यांच्या नेतृत्वाखाली एक प्रातिनिधिक शिष्टमंडळ इराकला गेलं होतं. यात चंद्रमौली कर्ण, सुलेमानिया विश्वविद्यालयाचे इतिहासकार, कुर्दिस्तानचे इराकी राजदूत या अभियानात सहभागी झाले होते. 

अयोध्या शोध संस्थानाचे निर्देशक योगेंद्र प्रताप सिंह यांनी दावा केला की, बेलुला जंगलात प्रभू श्रीरामाचे निशान हे प्रत्यक्षात राम असल्याचा पुरावा आहे. ती कोणतीही गोष्ट नाही. या शिष्टमंडळाने भारतीय आणि मेसोपोटामिया संस्कृतीमधील संबंधाचं विस्तृत अभ्यास करण्यासाठी पुरावे गोळा केलेले आहेत. 

योगेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, या चित्रात बनविलेले राजा आणि माकड हे राम आणि हनुमान आहेत. मात्र इराकमधील इतिहासकार आणि पुरातन तत्ववादी या चित्राला प्रभू रामाशी संबंधित असल्याचा दावा सत्य मानत नाही. यावर संशोधन होणं गरजेचे आहे यासाठी इराक सरकारकडे परवानगी मागितली आहे. त्यांची परवानगी मिळाल्यानंतर संशोधनाला सुरुवात होईल. मात्र सिंह यांनी दावा केला आहे की, लोअर मेसोपोटामिया 1900 वर्षापूर्वी ते भारतात आले होते आणि ते अनुवांशिक रुपाने सिंधू घाटीच्या संस्कृतीशी जोडले गेले आहेत. यूपीच्या सांस्कृतिक विभागाने सांगितले की, अयोध्येत बनविलेले असे शिल्प जगातील विविध कानाकोपऱ्यात पाहायला मिळतात. हे सर्व चित्र एकत्र आणून अयोध्येत एका छताखाली ते नागरिकांना पाहायला मिळावे असा प्रस्ताव आहे. 
 

Web Title: Indian embassy tracks mural in iraq cliff ayodhya sodh sansthan said it is lord ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.