शिफ्ट बदलल्याने गमावला भारतीय कर्मचा-याने प्राण

By admin | Published: July 18, 2014 02:08 PM2014-07-18T14:08:26+5:302014-07-18T14:22:22+5:30

मलेशियन एअरलाइन्समध्ये क्रूमेंबर म्हणून कार्यरत असलेल्या भारतीय वंशांच्या कर्मचा-याचा युक्रेनमधील विमान अपघातात मृत्यू झाला आहे.

Indian employee lost life after changing shift | शिफ्ट बदलल्याने गमावला भारतीय कर्मचा-याने प्राण

शिफ्ट बदलल्याने गमावला भारतीय कर्मचा-याने प्राण

Next

 ऑनलाइन टीम

क्वालालांपूर, दि. १८ - मलेशियन एअरलाइन्समध्ये क्रूमेंबर म्हणून कार्यरत असलेल्या भारतीय वंशांच्या कर्मचा-याचा युक्रेनमधील विमान अपघातात मृत्यू झाला आहे. आयत्या वेळी मित्रासाठी शिफ्टची अदलाबदली केल्याने त्याला एमएच १७ विमानात जावे लागले आणि हेच विमान युक्रेनजवळ अपघातग्रस्त झाले.
मलेशियात राहणारे भारतीय वंशाचे संजीद सिंह हे मलेशियन एअरलाइन्समध्ये क्रूमेंबर म्हणून कार्यरत होते. गुरुवारी संजीद सिंह यांनी एका सहका-यासोबत शिफ्टची अदलाबदली केली आणि त्यांची ड्यूटी एमएच १७ या विमानात लावण्यात आली. दुर्दैवाने युक्रेन - रशिया सीमारेषेवर क्षेपणास्त्र हल्ल्याद्वारे हे विमान पाडण्यात आले. यात विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर अशा २९८ जणांचा मृत्यू झाला. यात भारतीय वंशाचे संजीद सिंह यांचाही समावेश आहे. 
संजीद यांच्या मृत्यूमुळे मलेशियातील पेनांग येथे राहणा-या सिंह कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. संजीद यांचे वडिल जिज्जर सिंह मुलाच्या मृत्यूविषयी म्हणाले, काल संजीदशी माझे फोनवरुन बोलणे झाले होते. मात्र ते आमचे शेवटचे बोलणे असेल हे मला माहित नव्हते. हे सांगताना जिज्जर यांना अश्रू आवरेनासे झाले होते. मुलगा ब-याच दिवसांनी घरी येणार असल्याने संजीद यांची आईने त्याच्या आवडीचे जेवण बनवण्याचा बेतही आखला होता. मात्र त्यांच्या आनंदावर या अपघाताने पाणी फेरले. संजीद यांची पत्नीदेखील मलेशियन एअरलाइन्समध्येच कामाला असून या अपघातात संजीदचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी सर्वप्रथम तिलाच समजली होती. संजीद हा कुटुंबातील एकूलता एक मुलगा होता. 

Web Title: Indian employee lost life after changing shift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.