Indian Envoy Meets Taliban: मोठी बातमी! भारताची तालिबानसोबत 'फेस-टू-फेस' चर्चा; भारतानं नेमकं काय सांगितलं? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 06:19 PM2021-08-31T18:19:51+5:302021-08-31T18:20:40+5:30

India Met Taliban: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलेले तालिबानी आणि भारतीय राजदूत यांच्यात कतारच्या दोहा येथे 'फेस-टू-फेस' बैठक झाली आहे.

Indian envoy meets Taliban representative in Doha after complete US troops' withdrawal | Indian Envoy Meets Taliban: मोठी बातमी! भारताची तालिबानसोबत 'फेस-टू-फेस' चर्चा; भारतानं नेमकं काय सांगितलं? वाचा...

Indian Envoy Meets Taliban: मोठी बातमी! भारताची तालिबानसोबत 'फेस-टू-फेस' चर्चा; भारतानं नेमकं काय सांगितलं? वाचा...

Next

India Met Taliban: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलेले तालिबानी आणि भारतीय राजदूत यांच्यात कतारच्या दोहा येथे 'फेस-टू-फेस' बैठक झाली आहे. यात अफगाणिस्तानातील सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा झाली असून तेथील भारतीयांच्या सुरक्षेचाही मुद्दा भारताने तालिबानसमोर उपस्थित केला आहे. भारताचे राजदूत दिपक मित्तल यांची दोहा येथील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख अब्बास स्टानेकझाई यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. (Indian envoy meets Taliban representative in Doha after complete US troops' withdrawal)

अमेरिकेचं सैन्य माघारी फिरताच पंजशीरवर हल्ला करायला पोहोचलं तालिबान, पण घडलं उलटंच!

    तालिबानच्या अब्बास यांच्यासोबतच्या बैठकीत अफगाणिस्तानातील भारतीयांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यात तालिबानकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर आली आहे. अफागणिस्तानातील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांना सुखरुपरित्या मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करण्याबाबत तालिबानसोबत चर्चा झाली आहे. यासोबतच अफगाणिस्तानच्या भूमीचा यापुढे दहशतवादासाठी वापर होण्याच्या शक्यताची मुद्दा भारतानं चर्चेत उपस्थित केला. भारतानं उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक पद्धतीनं विचार करत असल्याची ग्वाही यावेळी तालिबाननं दिल्याचंही परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. अफगाणिस्तानातून आता अमेरिकन सैन्यानंही पूर्णपणे माघार घेतली आहे. त्यामुळे काबुल विमानतळावरही आता तालिबान्यांनी कब्जा केला आहे. त्यामुळे भारतीय राजदूतांनी तालिबानसोबत केलेली ही बैठक अतिशय महत्वाची मानली जात आहे.

    भारताला धोका! दोन दहशतवादी संघटना एकत्र आल्या; अफगाणमध्ये 'तहरीक-ए-तालिबान अमिरात'ची स्थापना

    अमेरिका आणि जगाशी चांगले संबंध ठेवायचे आहेत - तालिबान

    अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर भारतासमोर अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तालिबाननं सत्ता काबिज केल्यानंतर भारत अफगाणिस्तानबाबत नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. भारतात केल्या गेलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर तालिबानसोबत भारत चर्चा करणं कठीण असल्याचं बोललं जात आहे. पण गेल्या काही वर्षात भारतानं अफगाणिस्तानमध्ये केलेली हजारो कोटींची गुंतवणूक आणि तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर तालिबानसोबत चर्चा करण्याची भूमिका केंद्र सरकार घेऊ शकतं अशीही शक्यता वर्तविण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भारतीय राजदूतांनी आज तालिबानसोबत केलेली चर्चा याचाच प्रत्यय देणारी ठरली आहे. त्यामुळे आगामी काळात भारत तालिबानसोबत चर्चेची तयारी ठेवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

    Web Title: Indian envoy meets Taliban representative in Doha after complete US troops' withdrawal

    Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.