सोशल मिडियावर भारतीय चाहत्यांचा धुमाकूळ, धोनीच्या हातात तस्कीनचं मुंडक असलेलं पोस्टर व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2016 12:29 AM2016-03-07T00:29:23+5:302016-03-07T11:16:16+5:30
धोनीच्या हातात तस्कीन अहमदचं मुंडक असलेलं शीर आहे. अन्य दुसऱ्या एका पोस्टमध्ये धोनीच्या बॅट खाली चेंडू ऐवजी तस्कीन अहमदचं मुंडक दाखवल आहे. तस्कीन अहमदचं आणि धोनीचे मुंडक असलेलं
Next
ऑनलाइन लोकमत
मीरपूर, दि. ६ - आशिया कप टी२० सामन्यात भारत आणि बांग्लादेशमध्ये आज झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा ८ विकेटने पराभव करत सहाव्यांदा आशिया चषक आपल्या नावावर केला. आणि सोशल माध्यामावर भारतीय संघावर शुभेछेचा पाऊस पडला. त्यापुर्वी काल अंतिम सामन्यापुर्वी चाहत्यांमध्ये सोशल मिडियावर युद्ध रंगलं होत. बांग्लादेशचा क्रिकेटपटू तस्कीन अहमदच्या हातात धोनीचं मुंडक असलेला पोस्टर सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. भारतातील चाहत्यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला होता.
आज त्याच मुद्दयावर पुन्हा सध्या सोशल मिडियावर यावरुन युद्ध रंगलं आहे. त्यात धोनीच्या हातात तस्कीन अहमदचं मुंडक असलेलं शीर आहे. अन्य दुसऱ्या एका पोस्टमध्ये धोनीच्या बॅट खाली चेंडू ऐवजी तस्कीन अहमदचं मुंडक दाखवल आहे. तस्कीन अहमदचं आणि धोनीचे मुंडक असलेलं आक्षेपार्ह पोस्टर समोरासमोर ठेवल असून सामन्यापुर्वी आणि सामन्यानंतर असे म्हटले आहे. एक प्रकारे भारतीय प्रेषकांनी बांग्लादेशमधील क्रिकेट चाहत्यानां या माध्यामातून उत्तर दिल्यासारखे आहे.
याअगोदरही २०१५ मध्ये बांग्लादेशमधील वृत्तपत्राने भारतीय संघाचं अर्धमुंडण केलेला फोटो छापला होता. त्यावेळीदेखील बांग्लादेशवर जोरदार टीका झाली होती.
सोशल मिडियावर भारतीय संघावर अभीनंदनांचा वर्षाव