भारतीय चित्रपट, जाहिरातींवर पाकिस्तानात बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 03:49 AM2019-08-17T03:49:42+5:302019-08-17T03:51:53+5:30
भारत सरकारने काश्मीरविषयक घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तानने एकीकडे भारतातील व्यापार तर तोडलाच; पण आता पाकिस्तानी टीव्ही चॅनल्सवरून भारतीय कंपन्यांच्या जाहिराती दाखविण्यावरही बंदी आणली आहे.
इस्लामाबाद : भारत सरकारने काश्मीरविषयक घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तानने एकीकडे भारतातील व्यापार तर तोडलाच; पण आता पाकिस्तानी टीव्ही चॅनल्सवरून भारतीय कंपन्यांच्या जाहिराती दाखविण्यावरही बंदी आणली आहे.
तसेच पाकिस्तानातील दुकानांतून भारतीय वस्तूंची विक्री केली जाऊ नये, यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली
आहे.
भारतीय चित्रपट पाकिस्तानातील चित्रपटगृहांमध्ये दाखविण्यास आधीच बंदी आहे. त्यामुळे या चित्रपटांच्या सीडी बाजारात विकल्या जात होत्या. आता या चित्रपटांच्या सीडी विकण्यावरही पाकिस्तान सरकारने बंदी घातली आहे. या सीडी विकणाऱ्या दुकानांवर छापे मारण्यात येत आहेत आणि त्या जप्त केल्या जात आहेत.
बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वस्तूंची विक्री पाकिस्तानात होते. पण टीव्हीवर त्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये भारतीय चित्रपट कलाकार, क्रिकेटपटू दिसतात. त्याही जाहिरातींवर पाकिस्तानने बंदी घातली आहे.