नॅशनल जिओग्राफिक बी स्पर्धेत भारतीयांचा झेंडा
By Admin | Published: May 19, 2017 02:16 AM2017-05-19T02:16:04+5:302017-05-19T02:16:04+5:30
अमेरिकेतील प्रतिष्ठित नॅशनल जिओग्राफिक बी स्पर्धेत पुन्हा एकदा भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व गाजविले. यंदाच्या स्पर्धेचे पहिले बक्षिस व ५० हजार डॉलरची
वॉशिंग्टन : अमेरिकेतील प्रतिष्ठित नॅशनल जिओग्राफिक बी स्पर्धेत पुन्हा एकदा भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व गाजविले. यंदाच्या स्पर्धेचे पहिले बक्षिस व ५० हजार डॉलरची शिष्यवृत्ती १४ वर्षांच्या प्रणय वरदा याने जिंकली. वेदा भट्टराम हा आणखी एक भारतीय वंशांचा मुलगा तिसरा आला आहे.
यंदाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या १० स्पर्धकांपैकी सहा भारतीय वंशाचे होते. गेल्या वर्षीची स्पर्धा ही भारतीय वंशाच्या मुलाने जिंकली होती. गेल्या एक दशकापासून या स्पर्धेत भारतीय-अमेरिकी विद्यार्थ्यांचा दबदबा आहे.
जिंकण्याची मला पूर्ण खात्री होती. खूप दिवस परिश्रम केले आणि आता यश मिळाल्यामुळे समाधान वाटत आहे, अशी प्रतिक्रिया प्रणयने व्यक्त केली. गेल्यावर्षी या स्पर्धेचा उपविजेता राहिलेल्या प्रणयने यावर्षी स्पर्धा जिंकण्याच्या निर्धाराने तयारी केली होती. (वृत्तसंस्था)