वय फक्त 4 वर्ष; भारतीय वंशाच्या चिमुकलीनं आधी 'कॅन्सर' अन् आता 'कोरोनावर' केली मात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 10:26 PM2020-04-28T22:26:53+5:302020-04-28T22:44:28+5:30

करोनाची लागण झाल्यानंतर शिवानीला 1 एप्रिलला अल-फुतैमिम हेल्थ हबमध्ये दाखल करण्यात आले होते. तिची आई स्वतःच आरोग्य कर्मचारी आहे. आईच्या संपर्कात आल्यानेच तिला कोरोनाची लागण झाली.

Indian girl beats Corona virus after surviving cancer in Dubai sna | वय फक्त 4 वर्ष; भारतीय वंशाच्या चिमुकलीनं आधी 'कॅन्सर' अन् आता 'कोरोनावर' केली मात

वय फक्त 4 वर्ष; भारतीय वंशाच्या चिमुकलीनं आधी 'कॅन्सर' अन् आता 'कोरोनावर' केली मात

Next
ठळक मुद्देशिवानी असे या चिमुकलीचे नाव आहेयूएईमध्ये कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये ती सर्वात कमी वयाची असल्याचे मानले जातेआईच्या संपर्कात आल्याने शिवानीला कोरोनाची लागण झाली होती

दुबई : येथे राहणाऱ्या एका चार वर्षीय भारतीय वंशाच्या चिमुकलीने आधी कॅन्सर आणि आता चक्क कोरोनावर मात केली आहे. यूएईमध्ये कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये ती सर्वात कमी वयाची असल्याचे मानले जाते. शिवानी असे या चिमुकलीचे नाव आहे. शिवानीला कॅन्सर झाला होता. तिने गेल्या वर्षीच कॅन्सरशी दोन हात करून त्यावर विजय मिळवला. मात्र, आता तिला कोरोनाची लागण झाल्याने तिच्या कुटुंबीयांची चिंता वाढली होती. मात्र, शिवानीने कोरोनाचा धिरोदात्तपणे सामना करत हे संकटही लिलया पार केले. 

CoronaVirus: 'त्या' अफवेमुळे इराणमध्ये हाहाकार; 728 जणांचा मृत्यू, शेकडो लोक झाले अंध

आईमुळे झाला होता संसर्ग -
गल्फ न्यूजनुसार, करोनाची लागण झाल्यानंतर शिवानीला 1 एप्रिलला अल-फुतैमिम हेल्थ हबमध्ये दाखल करण्यात आले होते. तिची आई स्वतःच आरोग्य कर्मचारी आहे. आईच्या संपर्कात आल्यानेच तिला कोरोनाची लागण झाली. प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, कुठल्याही प्रकारची लक्षणे नसताना शिवानी आणि तिच्या वडिलांची तपासणी करण्यात आली होती. यात शिवानीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. तर तिचे वडील पूर्णपणे सुरक्षित आहेत. शिवानी आणि तिच्या आईला एकाच ठिकाणी भरती करण्यात आले होते. मात्र, तिच्यासाठी काही विशेष व्यवस्था करण्यात आली होती. कारण ती गेल्या वर्षीच किडनीच्या कॅन्सरमधून बाहेर पडली होती. शिवानीला 20 एप्रिलला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोना पसरवणारेच स्वत:ला 'कोरोना वॉरियर्स' म्हणतायेत, 'या' केंद्रीय मंत्र्याचा तबलिगींवर निशाणा

डॉक्टरही हैराण -
यासंदर्भात बोलताना अल-फुतैमित हेल्थ हबचे मेडिकल डायरेक्टर डॉ. थोल्फकर अल बाज म्हणाले, 'शिवानीला गेल्या वर्षीच केमोथेरेपीतून जावे लागले. त्यामुळे तिची रोगप्रकार शक्ती अजूनही कमीच आहे. डॉक्टरांना तिची प्रकृती बिघडण्याची भीती होती. त्यामुळे ती कायमच नजरेच्या टप्प्यात होती. सुदैवाने कोरोनामुळे तिला काहीही झाले नाही. 20 दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. आता ती तिच्या घरी 14 दिवस क्वारंटाइनमध्ये राहील.'

कोरोनावर मात करण्यासाठी देशातील 'या' 15 जिल्ह्यांमध्ये विजय आवश्यक, महाराष्ट्रातील 3 जिल्हे महत्वाचे

Web Title: Indian girl beats Corona virus after surviving cancer in Dubai sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.