ढाका दहशतवादी हल्ल्यात भारतीय तरुणीचा मृत्यू

By admin | Published: July 2, 2016 03:56 PM2016-07-02T15:56:09+5:302016-07-02T18:26:12+5:30

बांगलादेशची राजधानी ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तारुषी जैन या भारतीय तरुणीचाही मृत्यू झाला आहे

Indian girl dies in Dhaka terror attack | ढाका दहशतवादी हल्ल्यात भारतीय तरुणीचा मृत्यू

ढाका दहशतवादी हल्ल्यात भारतीय तरुणीचा मृत्यू

Next
ऑनलाइन लोकमत - 
ढाका, दि. 02 - बांगलादेशची राजधानी ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तारुषी जैन (19) या भारतीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्यांमध्ये तारुषी जैनदेखील होती. दहशतवाद्यांनी तिची हत्या केली आहे. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन तारुषी जैनची हत्या झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला असून दुख: व्यक्त केलं आहे. तारुषीचे वडिल संजीव जैन यांच्याशी मी बातचीत केली असून देश त्यांच्यासोबत असल्याचंही त्यांनी ट्विटवरुन सांगितलं आहे.
 
तारुषी जैन 19 वर्षांची होती. ढाकामधील अमेरिकन स्कूलमधून तिने शिक्षण पुर्ण केलं होतं. शुक्रवारी रात्री ढाका येथील गुलशन परिसरातील रेस्टॉरंटवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 13 ओलिसांचादेखील समावेश आहे. मृतांमध्ये इटलीचे 8 नागरिक, जापानी, उत्तर कोरिया, एक भारतीय आणि काही बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे.
 
 
हल्ल्याची धुमश्चक्री अखेर संपली असून पोलिसांनी ६ दहशतवाद्यांना ठार केले असून एकाला जिवंत पकडले आहे. ढाका येथील परदेशी दूतावास, वकिलांतीची कार्यालये असलेला, सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या डिप्लोमॅटिक क्वार्टरच्या उपहारगृहातील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २० जण ठार झाले. मात्र लष्कराच्या जवानांनी दहशतवादयांना प्रत्युत्तर देत सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले व एकाला जिवंत पकडले.  जवानांनी काही परदेशी नागरिकांसह १३ ओलीसांची रेस्टॉरंटमधून सुखरूप सुटका केली. रेस्टॉरंटमधील गोळीबार आता थांबला असून १ दहशतवादी फरार झाल्याची माहिती मिळत आहे. 
 
 
शुक्रवारी रात्री करण्यात आलेल्या या हल्ल्याची जबाबादारी इसिसने (इस्लामिक स्टेट) स्वीकारली असून दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार व बॉम्बहल्ले करत अनेक निरपराधांचे जीव घेतले. या हल्ल्यात काही परदेशी नागरिकांसह पोलिसांचाही मृत्यू झाला आहे. गेल्या १२ तासांहून अधिका काळापासून सुरू असलेली ही चकमक आता थंडावली असून अनेक ओलीसांना रेस्टॉरंटमधून सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आले.हल्ल्यातील जखमींना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
अनेक परदेशी पर्यटकांचा राबता असणारा ढाक्यातील 'गुलशन' परिसर महत्वपूर्ण मानला जातो. शुक्रवारी ( १ जुलै) रात्री ९ च्या सुमारास ८ ते १० दहशतवाद्यांनी आर्टिझन बेकरीत घुसून बेछूट गोळीबार करण्यास सुरूवात केली आणि एकच हल्लाकल्लोळ माजला. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस व लष्कराने घटनास्थळी धाव घेत आसपासच्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. मात्र रेस्टॉरंटमधील सुमारे ६० नागरिकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवत पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यातील काही जणांना ठारही केले.  त्यानंतर पोलिसांनी या रेस्टॉरंटला पूर्णपणे घेरत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान ढाका येथील भारतातील सर्व अधिकारी सुरक्षित असल्याचे परराष्ट्र मंत्रालयातर्फे स्प्ष्ट करण्यात आले आहे. 
 

Web Title: Indian girl dies in Dhaka terror attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.