भारतप्रेमी हॅकर्सने घातला धुमाकूळ! पाक, चीन लष्करांच्या तब्बल १५००० फाईल्स पळविल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 03:45 PM2022-07-25T15:45:14+5:302022-07-25T15:47:28+5:30

Cyber Attack on Pakistan-China Army: भारतप्रेमी हॅकरनी चीनच्या संरक्षण संस्थांनाच सुरूंग लावला आहे. दोन्ही देश एकत्र येऊन सायबर सिक्युरिटीवर काम करत आहेत. या देशांनी सायबर स्पेसमध्ये हेरगिरी झाल्याचा दावा केला आहे. 

Indian hackers attack! As many as 15000 files of Pakistan, China armies were stolen in May | भारतप्रेमी हॅकर्सने घातला धुमाकूळ! पाक, चीन लष्करांच्या तब्बल १५००० फाईल्स पळविल्या

भारतप्रेमी हॅकर्सने घातला धुमाकूळ! पाक, चीन लष्करांच्या तब्बल १५००० फाईल्स पळविल्या

Next

इस्लामाबादमधून मोठी खळबळ उडवून देणारी बातमी येत आहे. यामुळे बलाढ्य अशा चीन आणि पाकिस्तानी लष्करामध्ये धुमाकूळ माजला आहे. दोघांच्याही तब्बल १५००० फाईल्स भारताचे समर्थन करणाऱ्या हॅकरनी पळविल्या आहेत. मे महिन्यात चीन आणि पाकिस्तानवर मोठा सायबर हल्ला झाला आहे. 

भारतप्रेमी हॅकरनी चीनच्या संरक्षण संस्थांनाच सुरूंग लावला आहे. दोन्ही देश एकत्र येऊन सायबर सिक्युरिटीवर काम करत आहेत. या देशांनी सायबर स्पेसमध्ये हेरगिरी झाल्याचा दावा केला आहे. 

पाकिस्तानी डिफेन्स ऑफिसरकडून आलेल्या १५ हजारहून अधिक फाईल्स हॅकरनी पळविल्याचे चीनने म्हटले आहे. हॅकर्सनी काही गोष्टी चीनमधील सर्व्हरवर ठेवल्या होत्या, ज्यामुळे हॅकिंग झाल्याचे लक्षात आले. अशाचप्रकारची घटना मार्चमध्ये झाली होती. पाकिस्तानी नेव्हीची माहिती पळविण्यात आली होती. 

चीनच्या सरकारी मीडियामध्ये महिनाभरापूर्वीच याची माहिती आली होती. यामध्ये हे हॅकर भारतातीलच आहेत, आणि एकेक करून हल्ला करत आहेत. गेल्या वर्षी याच हॅकरनी चीनच्या लष्करावर हल्ला केला होता. ते केवळ डेटा चोरीच करत नाहीएत तर पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरच उध्व्स्त करत असल्याचा दावा करण्यात आला होता. 

काही महिन्यांपूर्वीच भारतावरही मोठा सायबर हल्ला करण्यात आला होता. अनेक सरकारी वेबसाईट हॅक करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी भारताचे समर्थन करणाऱ्या हॅकर्सनी पाकिस्तान आणि चीनच्या सुरक्षा संस्थांवर सायबर हल्ले केले. यामुळे पाकिस्तानी अधिकाऱ्यांमध्ये पळापळ झाली होती. दोन्ही देशांदरम्यान होत असलेल्या लष्करी आणि भारत विरोधी कारवायांचे हे डॉक्युमेंट होते. 

Web Title: Indian hackers attack! As many as 15000 files of Pakistan, China armies were stolen in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.