दुबईत मालमत्तेसाठी भारतीयांचा पुढाकार!

By Admin | Published: March 24, 2017 12:47 AM2017-03-24T00:47:03+5:302017-03-24T00:47:03+5:30

संयुक्त अरब आमिरातीतील जमीन-जुमला (रिअल्टी) उद्योगात भारतीय गुंतवणूकदारांची तब्बल ३.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक आहे.

Indian initiative for property in Dubai! | दुबईत मालमत्तेसाठी भारतीयांचा पुढाकार!

दुबईत मालमत्तेसाठी भारतीयांचा पुढाकार!

googlenewsNext

दुबई : संयुक्त अरब आमिरातीतील जमीन-जुमला (रिअल्टी) उद्योगात भारतीय गुंतवणूकदारांची तब्बल ३.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक आहे. भारतीय गुंतवणूकदार दुबईत सर्वाधिक गुंतवणूक करणारे विदेशी नागरिक ठरले आहेत.
दुबई लँड डेव्हलपमेंट विभागाने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली. त्यानुसार, गेल्या वर्षी आमिरातीतील जमीन-जुमला क्षेत्रात एकूण २.४ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली. ५५,९२८ गुंतवणूकदारांनी ही गुंतवणूक केली. यात भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच भारतीयांचा गुतंवणुकीचा आकडाही सर्वाधिक आहे. ६,२६३ भारतीयांनी ३.२ अब्ज डॉलर गुंतविले आहेत.
अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी २ ते ४ एप्रिल या काळात दुबईत १३वा आंतरराष्ट्रीय प्रापर्टी शो आयोजित करण्यात आला आहे. शोची आयोजक कंपनी स्ट्रॅटेजिक मार्केटिंग अ‍ॅण्ड एक्झिबिशन्सचे सीईओ दाऊद अल शेजावी यांनी सांगितले की, दुबईत भारतीयांची गुंतवणूक वाढण्याची अनेक कारणे आहेत. सुरक्षित गुंतवणूक स्थान म्हणून आमिरातीचे असलेले स्थान, स्थिर आर्थिक वृद्धी आणि कमी झालेल्या किमती हे काही मूलभूत घटक त्यामागे आहेत. याशिवाय अनेक भारतीय दुबईत आपला व्यावसायिक तळ शोधत असतात. युरोप आणि पश्चिम आशियामधील व्यवसायासाठी हा तळ उपयुक्त ठरतो. (वृत्तसंस्था)

Web Title: Indian initiative for property in Dubai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.