नेट न्यूट्रॅलिटीचा फैसला करणाऱ्यांत भारतीय न्यायाधीश

By admin | Published: November 30, 2015 01:03 AM2015-11-30T01:03:22+5:302015-11-30T01:03:22+5:30

नेट न्यूट्रॅलिटीचे नियम कायदेशीर आहेत का? याचा फैसला करणाऱ्या तीन न्यायाधीशांत श्री श्रीनिवासन हे भारतीय वंशाचे एक न्यायाधीश आहेत.

The Indian judges who decide the net neutrality | नेट न्यूट्रॅलिटीचा फैसला करणाऱ्यांत भारतीय न्यायाधीश

नेट न्यूट्रॅलिटीचा फैसला करणाऱ्यांत भारतीय न्यायाधीश

Next

वॉशिंग्टन : नेट न्यूट्रॅलिटीचे नियम कायदेशीर आहेत का? याचा फैसला करणाऱ्या तीन न्यायाधीशांत श्री श्रीनिवासन हे भारतीय वंशाचे एक न्यायाधीश आहेत.
अमेरिकेच्या न्यायालयात ४ डिसेंबर रोजी यावर सुनावणी होणार आहे. या निकालाकडे जगाचे लक्ष लागले आहे. या तीन न्यायाधीशांमध्ये प्रामुख्याने स्टिफन एफ विल्यम्स व डेव्हिड एस टेटल यांचा समावेश आहे. अमेरिकेतील उच्चपदस्थ न्यायाधीशांपैकी श्रीनिवासन हे एक न्यायाधीश आहेत. श्रीनिवासन यांची नियुक्ती २०१३ मध्ये उच्च न्यायालयात झाली आहे. तथापि, मोफत आणि खुले इंटरनेट ही ओबामा यांची निवडणूक प्रचारातील एक प्रमुख घोषणा होती; मात्र याबाबत आता श्रीनिवासन आणि अन्य दोन न्यायाधीश काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. श्रीनिवासन हे मूळचे चंदीगडचे रहिवासी असून माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या निकटवर्तीयांपैकी ते एक आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी पदवी संपादन केलेली आहे. अतिशय मेहनती आणि विनम्र अशी श्रीनिवासन यांची ख्याती आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The Indian judges who decide the net neutrality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.