भारताच्या शीरपेचात मानाचा तुरा; गणितज्ज्ञ निखिल श्रीवास्तव यांचा मायकल अँड शीला हेल्ड पुरस्कारानं सन्मान

By जयदीप दाभोळकर | Published: January 25, 2021 12:40 PM2021-01-25T12:40:05+5:302021-01-25T12:43:40+5:30

कॅडिसन-सिंगर समस्या आणि रामानुज ग्राफशी निगडीत अनुत्तरीत प्रश्नांचं त्यांनी शोधलं उत्तर

Indian mathematician Nikhil Srivastava named joint winner of Michael and Sheila Held Prize | भारताच्या शीरपेचात मानाचा तुरा; गणितज्ज्ञ निखिल श्रीवास्तव यांचा मायकल अँड शीला हेल्ड पुरस्कारानं सन्मान

भारताच्या शीरपेचात मानाचा तुरा; गणितज्ज्ञ निखिल श्रीवास्तव यांचा मायकल अँड शीला हेल्ड पुरस्कारानं सन्मान

Next
ठळक मुद्देकॅडिसन-सिंगर समस्या आणि रामानुज ग्राफशी निगडीत अनुत्तरीत प्रश्नांचं त्यांनी उत्तर शोधलं आहे. श्रीवास्तव हे सध्या कॅलिफोर्निया विद्यापीठात गणिताचे असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत

तरूण भारतीय गणितज्ज्ञ निखिल श्रीवास्तव यांना गणितातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा 'मायकल अँड शीला हेल्ड पुरस्कारा'नं सन्मानित करण्यात आलं. निखिल श्रीवास्तव हे गेल्या अनेक काळापासून कॅडिसन-सिंगर समस्या आणि रामानुज ग्राफवर अनुत्तरीत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना अन्य दोन विजेत्यांसह संयुक्तरित्या हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

कॅलिफोर्निया विद्यापीठ, वर्कलेचे निखिल श्रीवास्तव, इकोल पॉलिटेक्निक फेडरल डी लॉसानंचे अॅडम मार्क्स आणि येल विद्यापीठाते डॅनिअल अॅलन स्पिलमॅन यांना २०२१ चा मायकल अँड शीला हेल्ड पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायंसेजनं दिली. पदक आणि १ लाख डॉलर्स असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 

निखिल श्रीवास्तव, मार्क्स आणि स्पिलमॅन यांनी कॅडिसन-सिंगर समस्या आणि रामानुज ग्राफशी निगडीत गेल्या मोठ्या कालावधीपासून अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं शोधली आहेत. या प्रक्रियेत रेखीय बीजगणित, बहुपदी भूमिती आणि आलेख सिद्धांत यांच्यातील एक नवीन नव्या संबंधांचा शोध घेण्यात आला आहे. निखिल श्रीवास्तव हे सध्या कॅलिफोर्निया विद्यापीठात गणिताचे असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.

Web Title: Indian mathematician Nikhil Srivastava named joint winner of Michael and Sheila Held Prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.