'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 09:36 PM2024-11-14T21:36:37+5:302024-11-14T21:37:15+5:30

Indian MEA on Russia-Ukraine : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत चर्चेत आहे.

Indian MEA on Russia-Ukraine : 'Pakistan has relations with many countries, but...', Jaishankar's important reaction on India-Russia friendship | 'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया

'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया

Foreign Minister S. Jaishankar’s Interview : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची एक मुलाखत खूप चर्चेत आहे. एका ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीला परराष्ट्रमंत्र्यांनी ही मुलाखत दिली आहे. मुलाखतीत भारताच्यारशियाशी असलेल्या मैत्रीच्या प्रश्नावर एस. जयशंकर यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिले. ऑस्ट्रेलियन न्यूज अँकरने भारत-रशिया संबंधांबाबत भारतीय परराष्ट्रमंत्र्यांना प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, भारताच्या ऑस्ट्रेलियासोबतच्या संबंधांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. 

पाकिस्तानबद्दल काय म्हणाले जयशंकर...
ऑस्ट्रेलियन न्यूज अँकरने भारताच्या रशियाशी असलेल्या मैत्रीमुळे ऑस्ट्रेलियासोबतच्या संबंधांमध्ये काही अडचण आहे का? असा प्रश्न जयशंकर यांना विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, आमच्या रशियासोबत असलेल्या मैत्रिचा ऑस्ट्रेलियाशी असलेल्या संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. आजच्या काळात कोणत्याही देशाशी विशेष संबंध नाहीत. पाकिस्तानला टोला लगावत जयशंकर म्हणथात, तुमच्या तर्कानुसार विचार केला तर अनेक देशांचे पाकिस्तानशी संबंध आहेत. अशा स्थितीत भारताने काळजी करण्याची गरज आहे का?

भारत-रशिया संबंधांचा जगाला फायदा 
जयशंकर पुढे म्हणाले की, भारताच्या रशियासोबतच्या चांगल्या संबंधांचा आंतरराष्ट्रीय समुदायाला फायदा होत आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयावर जयशंकर म्हणतात, भारताने हे केले नसते, तर जागतिक ऊर्जा बाजार पूर्णपणे नष्ट झाला असता. जगात ऊर्जेचे संकट आले असते, जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असत्या आणि जगभर महागाई शिगेला पोहोचली असती. भारताचे रशियासोबतचे चांगले संबंध रशिया आणि युक्रेन यांच्यात चर्चा सुरू करण्यास मदत करू शकतात.

भारताचे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी चांगले संबंध 
रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी भारताचे चांगले संबंध आहेत. अशा परिस्थितीत भारत युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांशी चर्चा करण्यास सक्षम आहे. जगाला आणि अगदी ऑस्ट्रेलियालाही अशा देशाची गरज आहे, जो युद्धाला चर्चेच्या टेबलावर आणण्यास मदत करू शकेल. बहुतांश युद्धे वाटाघाटीच्या टेबलावर संपतात, अशी प्रतिक्रियाही जयशंकर यांनी दिली.  

Web Title: Indian MEA on Russia-Ukraine : 'Pakistan has relations with many countries, but...', Jaishankar's important reaction on India-Russia friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.