अमेरिकेला वापरता येणार भारतीय नौदलाचे तळ
By admin | Published: August 30, 2016 11:08 AM2016-08-30T11:08:05+5:302016-08-30T11:08:05+5:30
परस्परांची जमीन, हवाई हद्द आणि नौदल तळ वापरण्याच्या महत्वाच्या करारावर सोमवारी भारत आणि अमेरिकेने स्वाक्षरी केली.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ३० - परस्परांची जमीन, हवाई हद्द आणि नौदल तळ वापरण्याच्या महत्वाच्या करारावर सोमवारी भारत आणि अमेरिकेने स्वाक्षरी केली. त्यामुळे दोन्ही देशांना आता दुरुस्ती आणि वस्तू पुरवठयासाठी परस्परांचे तळ वापरता येतील.
हा करार म्हणजे भारत-अमेरिका संरक्षण भागीदारी अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल आहे. चीनच्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी भारत आणि अमेरिका अधिक जवळ येत चालले आहेत.
अन्य जवळच्या सहका-यांप्रमाणेच भारता बरोबर संरक्षण व्यापार आणि तंत्रज्ञान शेअरींग वाढवणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव अॅश कार्टर आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या कराराची माहिती दिली. या करारामुळे संयुक्त मोहिम, सरावा दरम्यान भारत आणि अमेरिकन नौदलाला परस्परांना मदत करणे अधिक सोपे झाले आहे असे पर्रिकर यांनी सांगितले.