सॅल्यूट : हा आहे भारतीय वंशाचा 'हिरो', ज्यानं अेरिकेतील दंगलीत डझनावर लोकांना दिला घरात आश्रय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 06:19 PM2020-06-03T18:19:46+5:302020-06-03T18:28:48+5:30
निदर्शन करणाऱ्या एका 22 वर्षांच्या तरुणाने सांगितले, की दुबे यांनी आपली परवा केली नाही आणि इतरांना सुरक्षित ठेवले. ते या लोकांना अधिकाराच्या बाबतीत बोलत होते आणि रात्रभर त्यांचे मनोबल वाढवत होते.
वॉशिंग्टन : अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर रस्त्यावर उतरलेल्या निदर्शकांसाठी भारतीय वंशाचा एक तरूण देवदूत बणून समोर आला. वॉशिंग्टनमध्ये सोमवारी रात्री कर्फ्यूनंतर निदर्शन करणाऱ्या 60हून अधिक 'Black Lives Matter' निदर्शकांना राहुल दुबे यांनी आपल्या घरात थांबवले. या कोलांना अटक होण्यापासून वाचवण्यासाठी राहुल यांनी आपल्या घराचे दरवाजे खुले केले होते.
'आपली नाही, इतरांची चिंता'
राहुल यांनी सांगितले, जेव्हा निदर्शक त्यांच्या घराच्या समोरील दरवाज्याने घरात येत होते, तेव्हा पोलीस केवळ दोन घरं दूर होते. निदर्शन करणाऱ्या एका 22 वर्षांच्या तरुणाने सांगितले, की दुबे यांनी आपली परवा केली नाही आणि इतरांना सुरक्षित ठेवले. ते या लोकांना अधिकाराच्या बाबतीत बोलत होते आणि रात्रभर त्यांचे मनोबल वाढवत होते. जेव्हा दुबे यांना हिंसेसंदर्भात विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, निदर्शक सन्मानानेच निदर्शन करत होते. ते आपले हात खुले करून 'अम्हाला जाऊ द्या,' असे वारंवार म्हणत होते.
लडाख म्हणजे डोकलाम नाही, युद्धासाठी तयार; चीनची भारताला थेट धमकी
'केवळ प्रेम' -
या निदर्शकांवर पेपर स्प्रे मारण्यात आला होता. राहुल यांच्या घरात जाण्यापूर्वी ते जवळपास 10 मिनिटे खोकलत आणि डोळे चोळत होते. हे लोक बचाव करण्यासाठी पळत होते. यावेळी अनेक जण पायऱ्यांवरही पडले. मात्र, सर्वांनीच एकमेकांची मदत केली.
Rahul Dubey took dozens of protesters into his home and sheltered them overnight while police waited outside to arrest them. Repeatedly refused to let the cops in. This morning they were able to leave freely. Be like Rahul. Don't cooperate with police thugs. https://t.co/B9QLop5TXT
— Carlos Maza 🌹 (@gaywonk) June 2, 2020
दुबे यांनी एनबीसी वॉशिंगटनशी बोलताना सांगितले, पोलिसांनी अनेक वेळा त्यांच्या घरात येण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुबे यांनी प्रत्येक वेळा पोलिसांना सांगितले, की त्यांच्या घरात निदर्शकांचे स्वागत आहे. 'तेथे अत्यंत प्रेम होते, अंधारातील धावपळीत, रात्री 3 वाजता लोकांनी झोपायला हवे होते. मात्र, ते झोपले नाही. केवळ प्रेम होते आणि ते फारच सुंदर होते.'
George Floyd death: अमेरिकेत 52 वर्षांनंतर सर्वात मोठा हिसाचार; 40 शहरांमध्ये कर्फ्यू