भारतीय वंशाच्या रवी भल्ला यांची होबोकेनच्या महापौरपदी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 03:14 PM2017-11-08T15:14:42+5:302017-11-08T15:17:10+5:30
अमेरिकेतील होबोकेन शहराच्या महापौरपदी भारतीय वंशाचे रवी भल्ला यांची निवड झाली आहे. महापौरपदाच्या शर्यतीत सहा उमेदवार होते. मात्र सर्वांना मागे टाकत भल्ला यांनी बाजी मारली आहे. प्रचाराच्या कालावधीमध्ये वाटण्यात आलेल्या काही पत्रकांमध्ये भल्ला यांना दहशतवादी असे पत्रके वाटून संबोधण्यात आले होते.
Next
ठळक मुद्देमागच्या आठवड्यात भल्ला यांच्या फोटोवर 'तुमच्या शहरावर दहशतवादाचा ताबा येऊ देऊ नका'! असे छापलेली पत्रके शहरातील सर्व गाड्यांवर लावण्यात आली होती. ही पत्रके महापौरपदाच्या शर्यतीतील दुसरे उमेदवार माईक डिफ्युस्कोज यांच्या नावाने काढण्यात आली होती.परंतु माईक यांनी त्यामध्ये आपला सहभाग नसल्याचे स्पष्ट केले होते.
न्यू यॉर्क- अमेरिकेतील होबोकेन शहराच्या महापौरपदी भारतीय वंशाचे रवी भल्ला यांची निवड झाली आहे. महापौरपदाच्या शर्यतीत सहा उमेदवार होते. मात्र सर्वांना मागे टाकत भल्ला यांनी बाजी मारली आहे. प्रचाराच्या कालावधीमध्ये अज्ञात लोकांनी वाटलेल्या पत्रकांमध्ये भल्ला यांना दहशतवादी असे पत्रके वाटून संबोधण्यात आले होते.
Thank you Hoboken. I look forward to being your Mayor! #TeamBhalla#FinishedStrongpic.twitter.com/UKPuXkDWGX
— Ravinder S. Bhalla (@RaviBhalla) November 8, 2017
भल्ला यांची महापौरपदी निवड झाल्याचे सध्याच्या महापौर डॉन झिमर यांनी जाहीर केले. झिमर यांनी आपण तिसऱ्यांदा महापौर बनण्यासाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर या निवडणुकीत भल्ला यांनी उतरण्याचे निश्चित केले आणि त्यांना विजयही मिळाला.
निवडून आल्यानंतर भल्ला यांनी आनंदाने पण अत्यंत संयमासह नम्रपणे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'माझ्यावर, माझ्या समुदायावर, आपल्या राज्यावर, आपल्या देशावर विश्वास ठेवल्याबद्दल मी आपला आभारी आहे. हेच अमेरिकेचे मूळतत्व आहे. प्रचाराचा काळ अत्यंत खडतर होता पण आता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे' अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
RT aaldef: More racist campaigning in Hoboken, NJ: Sikh American mayoral candidate RaviBhalla called a terrorist, https://t.co/niG2ChorZF
— #DefendDACA 🇺🇸⚔️🔥 (@EndDeportations) November 5, 2017
मागच्या आठवड्यात भल्ला यांच्या फोटोवर 'तुमच्या शहरावर दहशतवादाचा ताबा येऊ देऊ नका'! असे छापलेली पत्रके शहरातील सर्व गाड्यांवर लावण्यात आली होती. ही पत्रके महापौरपदाच्या शर्यतीतील दुसरे उमेदवार माईक डिफ्युस्कोज यांच्या नावाने काढण्यात आली असली तरी माईक यांनी यामध्ये आपला सहभाग नव्हता असे स्पष्टीकरण दिले होते. भल्ला यांच्या विजयानंतर माईक यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, 'शहराचे पहिले लैंगिकता प्रकट करणारे पहिले गे महापौर (ओपनली गे) होण्यापासून आपण थोडक्यात हुकलो. सर्वबाजूंनी प्रखर टीका होत असूनही
आम्ही गेली 9 वर्षे प्रशासन चालवणाऱ्यांविरोधातील आमचे आव्हान कायम ठेवले, भल्ला यांच्याविरोधात अत्यंत कमी फरकाने पराभूत झालो आहोत. भल्ला यांना सर्वसहमतीने काम करावे लागेल.'