भारतीय शांती सैनिकाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 04:38 AM2019-09-15T04:38:19+5:302019-09-15T04:38:23+5:30
कांगोच्या कयाकिंगमध्ये बुडालेल्या एका भारतीय शांती सैनिकाचा मृतदेह सापडला आहे.
संयुक्त राष्ट्रे : कांगोच्या कयाकिंगमध्ये बुडालेल्या एका भारतीय शांती सैनिकाचा मृतदेह सापडला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली.
ले. कर्नल गौरव सोळंकी हे कांगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मिशनमध्ये कार्यरत होते. ८ सप्टेंबर रोजी ते किवु सरोवर परिसरात गेले होते. पण, ते परत आले नाहीत. दरम्यान, प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी सांगितले की, या सैनिकाचा मृतदेह सापडला आहे. सेक्रेटरी जनरल आणि या मिशनचे प्रमुख लीला जुर्गई यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
शांतीसैनिकांची भारताची ही सर्वात मोठी दुसरी तुकडी आहे. यात २६२४ सैनिक आणि २७४ पोलीस कर्मचारी आहेत.