हेलिकॉप्टरचे पाते लागून कैलाश मानसरोवर यात्रेकरुचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 12:37 PM2018-08-15T12:37:47+5:302018-08-15T12:38:28+5:30

कैलाश मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या एका 42 वर्षिय यात्रेकरुचा नेपाळमध्ये हेलिकॉप्टरचे पाते लागल्यामुळे मृत्यू झाला आहे.

Indian pilgrim beheaded by rear blade of helicopter in Nepal | हेलिकॉप्टरचे पाते लागून कैलाश मानसरोवर यात्रेकरुचा मृत्यू

हेलिकॉप्टरचे पाते लागून कैलाश मानसरोवर यात्रेकरुचा मृत्यू

Next

काठमांडू/नवी दिल्ली- कैलाश मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या एका 42 वर्षिय यात्रेकरुचा नेपाळमध्ये हेलिकॉप्टरचे पाते लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. नेपाळच्या हिल्सा या डोंगराळ विभागामध्ये हे हेलिकॉप्टर उतरल्यावर हेलिकॉप्टरच्या मागच्या बाजूस असणारे पाते लागल्यामुळे नागेंद्र कुमार कार्तिक मेहता या यात्रेकरुचे प्राण गेले.
मुळचे मुंबईचे असलेले नागेंद्र कुमार कार्तिक मेहता कैलाश मानसरोवर यात्रेसाठी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती सहाय्यक मुख्य जिल्हा अधिकारी महेश कुमार पोखरेल यांनी दिली. हा अपघात झाला तेव्हा हेलिकॉप्टर जमिनीवर होते.



हेलिकॉप्टरपासून यात्रेकरुंनी दूर राहाणे अपेक्षित होते मात्र काही कारणाने नागेंद्र कुमार हेलिकॉप्टरच्या मागच्या बाजूस गेले आणि त्यांना रोटरच्या पात्याचा धक्का लागला. त्यांचा मृतदेह सिमिकोट येथे पोस्टमार्टेमसाठी नेण्यात आला असून त्यानंतर तो नातलगांकडे सोपविण्यात येईल. या अपघातानंतर हेलिकॉप्टरच्या मागच्या भागाचे नुकसान झाले आहे.



नेपाळचा सिमीकोट आणि हिल्सा हा भाग केवळ लहान विमाने आणि हेलिकॉप्टर्सच्या मदतीनेच इतर जगाशी जोडलेला आहे. इतर कोणत्याही मार्गाने येथे जाता येत नाही.
कैलाश मानसरोवर हे धार्मिकस्थळ चीनव्याप्त तिबेटमध्ये असून दरवर्षी हजारो भारतीय या यात्रेसाठी जातात. मात्र ही यात्रा अत्यंत खडतर प्रवास करुन पूर्ण करावी लागते.

Web Title: Indian pilgrim beheaded by rear blade of helicopter in Nepal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.