बांगलादेशमध्ये भारतीय गाण्यांच्या रिंगटोनवर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2015 04:34 AM2015-07-11T04:34:21+5:302015-07-11T04:34:21+5:30
भारतीय चित्रपटांप्रमाणेच आता बांगलादेशमध्ये भारतीय गाण्यांच्या रिंगटोन व कॉलरट्यूनवर बंदी घालण्यात आली आहे.
ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. ११ - भारतीय चित्रपटांप्रमाणेच आता बांगलादेशमध्ये भारतीय गाण्यांच्या रिंगटोन व कॉलरट्यूनवर बंदी घालण्यात आली आहे. कोर्टाच्या या निर्णयाचा बांगलादेशमधील लाखो मोबाईल ग्राहकांना फटका बसणार आहे.
बांगलादेशमध्ये भारत व भारतीय उपखंडातील अन्य देशांमधील चित्रपटांच्या आयातींवर बंदी आहे. याच धर्तीवर मोबाईल ऑपरेटरतर्फे दिल्या जाणा-या मुल्यवर्धीत सेवांमध्ये भारतीय व अन्य देशांच्या कॉलरट्यून व रिंगटोनवरही बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका ढाका येथील उच्च न्यायालयात दाखल झाली होती. कोर्टाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे ग्राह्य धरत भारतीय गाण्यांचा कॉलरट्यून व रिंगटोन म्हणून समावेश करण्यास ऑपरेटर्सना मज्जाव केला आहे. कोर्टाच्या या निर्णयाचा फटका बांगलादेशमधील लाखो मोबाईलधारकांना बसणार आहे.