अमेरिकेमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 07:03 AM2018-07-08T07:03:47+5:302018-07-08T07:04:11+5:30
अमेरिकेमध्ये भारतीय व्यक्तींवर हल्ल्याची घटना पुन्हा एकदा घडली असून, अमेरिकेतील कन्सास शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी एका भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे.
वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये भारतीय व्यक्तींवर हल्ल्याची घटना पुन्हा एकदा घडली असून, अमेरिकेतील कन्सास शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी एका भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. मृत विद्यार्थ्याची ओळख शरत कोपू अशी झाली असून, तो तेलगांणामधील वारंगल जिल्ह्यातील रहिवासी होती.
Sharath Koppu,26-year-old boy from Telangana who was studying in United States killed after unknown people opened fired in Missouri's Kansas City. Relative says,'he left for USA in Jan 2018. Unknown people open fired in Kansas City. He got injured & succumbed to injuries'(7.7.18) pic.twitter.com/NRk5WhaisL
— ANI (@ANI) July 7, 2018
शरत हा युनिव्हर्सिटी ऑफ मिजोरी-कंन्सास सिटीमध्ये शिकत होता. शरतचा चुलत भाऊ संदीप वेमुलाकोंडा याने या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, अज्ञात हल्लेखोरांच्या एका टोळक्याने कन्सासमधील एका रेस्टॉरंटमध्ये गोळीबार केला. ज्यामध्ये शरत याला पाच गोळ्या लागल्या. दरम्यान कन्सास सिटी पोलिसांनी हा हत्या आणि लुटीचा प्रकार असल्याचे सांगितले. तसेच संशयित हल्लेखोराचा व्हिडीओ जारी करून पोलिसांनी हल्लेखोरांबाबत माहिती देणाऱ्यास 10 हजार डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे.
The Kansas Police announced a reward of USD 10,000 for providing information about the suspect in regard to the robbery and murder of an Indian-origin student from Telangana, in the Kansas City
— ANI Digital (@ani_digital) July 7, 2018
Read @ANI Story | https://t.co/tkN7cp7kRdpic.twitter.com/HaWseQ5coc
याआधी गतवर्षी 2017 साली फेब्रुवारी महिन्यात श्रीनिवास कुचिभोटला या भारतीय तरुणाची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.