अमेरिकेत शिक्षणासाठी अर्ज करणारे भारतीय विद्यार्थी घटले

By admin | Published: March 29, 2017 01:51 AM2017-03-29T01:51:03+5:302017-03-29T01:51:03+5:30

वर्ण आणि वंश भेदावरून होणारा हिंसाचार आणि डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून व्हिसाच्या नियमांत होणाऱ्या बदलांच्या धास्तीमुळे

Indian students who apply for education in the US have dropped | अमेरिकेत शिक्षणासाठी अर्ज करणारे भारतीय विद्यार्थी घटले

अमेरिकेत शिक्षणासाठी अर्ज करणारे भारतीय विद्यार्थी घटले

Next

वॉशिंग्टन : वर्ण आणि वंश भेदावरून होणारा हिंसाचार आणि डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून व्हिसाच्या नियमांत होणाऱ्या बदलांच्या धास्तीमुळे अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीत खूपच घट झाली आहे.
अमेरिकेतील सहा मोठ्या उच्च शिक्षण गटांनी २५० पेक्षा जास्त अमेरिकन महाविद्यालये आणि विद्यापीठांत केलेल्या पाहणीतून हे चित्र समोर आले आहे. (वृत्तसंस्था)
भारत, चीन, नेपाळमधील अमेरिकन वकिलातून विद्यार्थ्यांना व्हिसा नाकारणे आणि इतर देशांतील खासगी व्यक्तींचे आता चांगले
स्वागत होण्याचे वातावरण अमेरिकेत घटल्याची भावना विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये निर्माण झाली आहे.
व्हिसाचे फायदे (प्रवास करता येणे, प्रवासानंतर अमेरिकेत पुन्हा प्रवेश मिळणे आणि रोजगाराची संधी) व व्हिसावरील बंधनांमध्ये बदल होऊ शकतील याचीही काळजी इच्छूक अर्जदारांना वाटते.
भारताने गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा घेतलेला निर्णय व डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घटलेले मूल्य हेदेखील मुद्दे या काळजीत भर घालणारे आहेत, असे वृत्तात म्हटले आहे.
भारतीय विद्यार्थ्यांतून पदवी शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांत 26% तर पदवीनंतरच्या शिक्षणासाठी 15% घट झाली आहे.
‘ओपन डोअर्स २०१६’ या नावाचा हा पाहणी अहवाल या आठवड्यात उपलब्ध होईल.
उच्च शिक्षणाच्या संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरून होणाऱ्या अर्जांत सरासरी 40% घट झाली आहे. सध्या अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्यांत  47%  विद्यार्थी (जवळपास पाच दशलक्ष) हे भारत आणि चीनचे आहेत. अमेरिकेत चीनमधून पदवीसाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जांत २५ टक्के आणि पदवीनंतरच्या शिक्षणासाठीच्या अर्जांत ३२ टक्क्यांची घट झाली आहे.

Web Title: Indian students who apply for education in the US have dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.