भारतीय टॅक्सी चालकावर ऑस्ट्रेलियात हल्ला
By admin | Published: May 22, 2017 06:51 PM2017-05-22T18:51:58+5:302017-05-22T18:51:58+5:30
ऑस्ट्रेलियात 25 वर्षीय भारतीय टॅक्सी चालकाला एका महिलेसह दोघा जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली.
Next
>ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. 22 - ऑस्ट्रेलियात 25 वर्षीय भारतीय टॅक्सी चालकाला एका महिलेसह दोघा जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. प्रदीप सिंह असे या भारतीय टॅक्सी चालकाचे नाव असून तो ऑस्टेलियात पर्यटन क्षेत्राचा अभ्यास करत आहे. त्याला येथील तस्मानिया राज्यातील सैंडीबे मॅक्डोनॉल्डच्या परिसरात एका महिलेसह दोन पर्यटकांकडून मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि.20) रात्री घडली.
येथील एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, महिला टॅक्सीत उलटी करणार होती, त्यावेळी प्रदीप सिंह त्या महिलेला खाली उतरण्यास सांगितले. त्यावेळी त्याला मारहाण करण्यात आली. प्रदीप सिंह त्यांना म्हणाला की, टॅक्सीत तुम्ही घाण केली, तर तुम्हाला साफ सफाई करण्याचे ज्यादाचे पैसे द्यावे लागतील. यावर त्या महिलेने प्रदीप सिंहला शिवीगाळ करत टॅक्सीचे भाडे आणि सफाईचे पैसे देण्यास नकार दिला. तसेच, या महिलेसह तिच्यासोबत असलेल्या दोघांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तुम्हा भारतीयांसोबत अशीच वागणूक केली पाहिजेत असे, ती महिला म्हणाली.
दरम्यान, याप्रकरणी येथील पोलिसांनी त्या महिलेसह एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्यांना 26 जूनला होबार्ट येथील न्यायदंडाधिका-यांसमोर हजर करण्यात येणार आहे. ते तिघेही दारुच्या नशेत होते. त्यामुळे हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच, प्रदीप सिंह याला सध्या रॉयल होबार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.