भारताने डोकलाममधून सैन्य मागे घेतले, आमचे सैनिक गस्त घालणारच - चीनचा अडेलतट्टूपणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 02:46 PM2017-08-28T14:46:36+5:302017-08-28T14:57:18+5:30
भारताने वादग्रस्त डोकलाम भागातून आपले सैन्य मागे घेतले असल्याचा दावा चीनने केला असून आपले सैनिक मात्र या भागात गस्त घालणारच असे म्हटले आहे.
नवी दिल्ली, दि. 28 - भारताने वादग्रस्त डोकलाम भागातून आपले सैन्य मागे घेतले असल्याचा दावा चीनने केला असून आपले सैनिक मात्र या भागात गस्त घालणारच असे म्हटले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही देशांचे सैन्य या भागातून मागे घेण्यात येत असल्याचे भारताने जाहीर केल्यानंतर काही तासांमध्येच चीनने भारताने माघार घेतल्याचा दावा केला आहे, असे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे.
भारताच्या सिक्कीम सीमेजवळ भूताननजीकच्या डोकलाम भागामध्ये दोन महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी भारत व चीनमध्ये तमाव सदृष स्थिती आहे. या भागात चीन रस्ते बांधत असून ते भारतासाठी धोक्याचे असल्याचे भारताने म्हटले तर, चीन आपल्या स्वायत्ततेत्या बाबतीत कुठलीही तडजोड करणार नाही असं सांगत चीनने आक्रमक भूमिका कायम ठेवली.
China Global Television network says China and India agree to end Donglang(Doklam) border standoff pic.twitter.com/Q2oUfJqULV
— ANI (@ANI) August 28, 2017
UPDATE: India and China agree to end border standoff at #Doklam, India says https://t.co/Noq8HXLQErpic.twitter.com/yyC4MR5Mm8
— Reuters India (@ReutersIndia) August 28, 2017
यामुळे दोन्ही देशांचे सैन्य समोरा समोर ठाकले आणि 1962 नंतर प्रथमच एवढी तणावाची वेळ दोन्ही देशांदरम्यान आली. मात्र, सोमवारी भारतीय परराष्ट्र खात्याने तणाव निवळत असल्याचे व दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यात येत असल्याचे सांगत चांगली बातमी दिली. या वृत्तास चिनी ग्लोबल टीव्ही नोटवर्कनेही दुजोरा दिला. मात्र, आता त्यानंतर आलेल्या चीनच्या या पवित्र्यानंतर तणाव निवळल्याच्या वृत्ताबाबतच संशय निर्माण झाला आहे.
#BREAKING: China confirms India's withdrawal of border personnel from face-off site at #Doklampic.twitter.com/0mKp8Ex4GU
— China Xinhua News (@XHNews) August 28, 2017
चिनी परराष्ट्र खात्याने डोकलाम भागातून भारतीय सैन्य हटल्याचे सांगत त्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि चिनी सैन्य मात्र या भागात गस्त घालत राहील असेही नमूद केले. एएफपी वरॉयटर्स या दोन्ही वृत्तसंस्थांनी हे वृत्त दिले आहे.