संयुक्त राष्ट्रातील अधिकारी रवी करकरा यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप; आठ पुरुषांची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 12:33 PM2018-08-10T12:33:19+5:302018-08-10T12:37:11+5:30
रवी करकरा हे 'यूएन वूमन'मध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अँड अॅडवोकसी टू द असिस्टंट सेक्रेटरी जनरल यांचे आणि याच विभागाचे डेप्युटी डायरेक्टर यांचे वरिष्ठ सल्लागार आहेत.
न्यू यॉर्क- संयुक्त राष्ट्राच्या लैंगिक समानता आणि महिला सबलीकरणासाठी काम करणाऱ्या ('यूएन वूमन') विभागातील भारतीय अधिकारी रवी करकरा यांच्यावर लैंगिक छळ केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. आठ पुरुषांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. रवी करकरा हे 'यूएन वूमन'मध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अँड अॅडवोकसी टू द असिस्टंट सेक्रेटरी जनरल यांचे आणि याच विभागाचे डेप्युटी डायरेक्टर यांचे वरिष्ठ सल्लागार आहेत. रवी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन आपल्यावर लैंगिक अत्याचार केले असा 8 पुरुषांनी आरोप केला आहे. याबाबत न्यूजवीकने वृत्त प्रसिद्ध केले आहे.
Ravi Karkara, senior adviser to the former deputy executive director of @UN_Women Lakshmi Puri, under investigation for sexual misconduct https://t.co/1NowQFEg78
— anjali mody (@AnjaliMody1) August 10, 2018
या आरोपानंतर तपास सुरु करण्यात आला असून यूएन वूमनने विभागातर्फे निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात, या संदर्भातील तपास वेगाने करण्यात येऊन त्यातून योग्य निष्कर्ष काढण्यात येईल. तसेच या तपासाला प्राधान्य देऊन अत्यंत सखोल चौकशी करण्यात येईल असेही म्हटले आहे. यूएन वूमनच्या निवदेनामध्ये करकरा यांचे नाव लिहिले नसून तेथे संबंधित कर्मचारी असा उल्लेख करण्यात आला आहे तर यूएनच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनामध्ये करकरा यांचे नाव घेण्यात आले आहे. याबाबत करकरा यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही.न्यूजवीकच्या माहितीनुसार स्टीव्ह ली या 25 वर्षांच्या पॉलिसी अॅक्टिविस्टने करकरा यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत.
Eight Men Have Accused a Senior U.N. Advisor of Sexual Misconduct, Sources Say: Exclusive shocking even one is bad in enough Ravi was able to move within the @un for years @UNICEF@UNHABITAT & @UN_Women & abuse his power for years @kerryandlacey https://t.co/6Rexr9hHLQ
— Mandy Sanghera (@Mandy_Sanghera1) August 8, 2018
करकरा यांनी युनीसेफ, यूएन वूमन तसेच सेव्ह द चिल्ड्रेनसाठी याआधी काम केले आहे. यूएन हॅबिटॅटमध्येही ते सल्लागार म्हणून काम पाहातात. वर्ल्ड वी वॉन्ट 2015 या योजनेचे ते सहअध्यक्ष होते.