बंदुकीच्या धाकावर भारतीय महिलेचे पाकिस्तानी व्यक्तीसोबत लग्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2017 04:10 PM2017-05-08T16:10:06+5:302017-05-08T16:10:06+5:30

पाकिस्तानातील एका नागरिकानं भारतीय महिलेशी बंदुकीच्या धाकावर लग्न केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

Indian woman gets married to Pakistani man on gunshot | बंदुकीच्या धाकावर भारतीय महिलेचे पाकिस्तानी व्यक्तीसोबत लग्न !

बंदुकीच्या धाकावर भारतीय महिलेचे पाकिस्तानी व्यक्तीसोबत लग्न !

Next

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 8 - पाकिस्तानातील एका नागरिकानं भारतीय महिलेशी बंदुकीच्या धाकावर लग्न केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. उज्मा हिने पतीविरोधात इस्लामाबाद कोर्टात एक याचिकाही दाखल केली आहे. याचिकेत पती ताहीर अली हा त्रास देऊन धमक्या देत असल्याचं तिने म्हटलं आहे. तसेच दंडाधिका-यांसमोर तिने स्वतःचा जबाबही नोंदवला आहे. पतीनं माझे इमिग्रेशन दस्तावेज हिसकावल्याचंही तिने सांगितलं आहे. उज्माला जोपर्यंत सुखरूप भारतात परत पाठवलं जात नाही, तोपर्यंत तिने भारतीय दूतावास सोडण्यास नकार दिला आहे. उज्मा ही स्वतःच्या मर्जीनं तिथे राहतेय आणि पाकिस्तान परराष्ट्र कार्यालयाशी बातचीत केल्यानंतर तिला बाहेर जाण्याची परवानगी देण्यात येईल, असं भारतीय दूतावासानं सांगितलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या पीडित महिलेनं 5 मे रोजी भारतीय उच्चायुक्तालयाकडे मदत मागितली होती आणि तिला आवश्यक मदत पुरवली जाणार आहे.

मात्र पाकिस्तानातील पतीनं भारतीय उच्चायुक्तालयावरच भारतीय पत्नीला ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे. आम्ही दोघेही व्हिसा घेण्यासाठी भारतीय दूतावासात गेलो होतो. त्यावेळी पत्नी अचानक बेपत्ता झाली, असं त्या पाकिस्तानी व्यक्तीनं सांगितलं आहे. उज्मा आणि ताहिर अली यांची ओळख मलेशियामध्ये झाली होती. त्याच वेळी दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून आले. त्यानंतर उज्मा 1 मे रोजी वाघा-अटारी सीमेवरून पाकिस्तानात दाखल झाली आणि त्यांनी 3 मे रोजी निकाह केला.

मात्र पाकिस्तानी वृत्तपत्र न्यूज इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार, दोघे जण उच्चायुक्तालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी स्वतःचा व्हिसा फॉर्म आणि फोन अधिका-यांकडे सुपूर्द केला. अधिका-यांनी बोलावल्यानंतर उज्मा बिल्डिंगच्या आत गेली, तिचा पती त्यावेळी बाहेरच होता. ब-याच वेळ झाला तरी उज्मा न आल्यानं अखेर पतीनं बिल्डिंगमध्ये प्रवेश केला. मात्र भारतीय उच्चायुक्तालयानं उज्मा इथे नसल्याचं सांगितलं. तसेच अधिका-यांनी त्यांचे तीन मोबाईल फोनही परत केले नाहीत.

Web Title: Indian woman gets married to Pakistani man on gunshot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.