भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 05:48 AM2024-09-30T05:48:36+5:302024-09-30T05:48:48+5:30

अनिवासी महिलांच्या शेकडो तक्रारी, ९ देशांत हेल्पलाइन सुरू

Indian women being harassed abroad for dowry; The husband is disappearing | भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब

भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : परदेशात गेल्यानंतर अनेक महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून आले आहे. कुणाला मारहाण झाली, कुणाचा हुंड्यासाठी छळ झाला, कुठे मुलाच्या ताब्यावरून वाद झाला, तर काहींचे पासपाेर्ट हिसकावून घेण्यात आले. अशा प्रकारच्या ४०० पेक्षा जास्त तक्रारी केंद्र सरकारच्या ‘एनआरआय’ सेलकडे प्राप्त झाल्या आहेत.

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने यासंदर्भात वर्ष २०२२ मधील आकडेवारी जाहीर केली.  अतिशय गंभीर स्वरूपाच्या तक्रारी या सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. अनेक प्रकरणात तर पती परदेशात गेल्यानंतर गायब झाल्याच्या तक्रारी आहेत. अशा प्रकरणामध्ये समन्वयाने वैवाहिक तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विविध विभागांना ३,५०० पत्रे पाठविण्यात आली आहेत. याशिवाय यूएई, बहरिन, कतार, कुवैत, ओमान, साैदी अरब, सिंगापूर आणि कॅनडा येथे हेल्पलाईनदेखील सुरू करण्यात आल्या आहेत.

Web Title: Indian women being harassed abroad for dowry; The husband is disappearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न