इसिसच्या नव्या व्हिडिओत भारतीय तरुण

By admin | Published: July 21, 2015 10:40 PM2015-07-21T22:40:55+5:302015-07-21T22:40:55+5:30

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियात (इसिस) दाखल झालेल्या भारतीयांवर लक्ष ठेवून असलेल्या सुरक्षा यंत्रणा इसिसमध्ये भरती झालेल्यांच्या

Indian youth in Isis's new video | इसिसच्या नव्या व्हिडिओत भारतीय तरुण

इसिसच्या नव्या व्हिडिओत भारतीय तरुण

Next

मुंबई : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियात (इसिस) दाखल झालेल्या भारतीयांवर लक्ष ठेवून असलेल्या सुरक्षा यंत्रणा इसिसमध्ये भरती झालेल्यांच्या हातात रायफली असल्याची छायाचित्रे सोमवारी प्रसिद्ध होताच कारवायांसाठी सरसावल्या. ही छायाचित्रे टिष्ट्वटर हँडल @ू्रँंू्रि2 या नावाने मॅग्नेट गॅसने पोस्ट केली होती. हे टिष्ट्वटर अकाऊंट फहाद शेख याने हाताळल्याचे समजले जाते. कल्याणचा हा तरूण फहाद शेख गेल्या वर्षी जे चार जण इसिसमध्ये गेले होते त्यापैकी एक आहे. त्याआधी दोन डझनपेक्षा जास्त मॅग्नेटगॅस नावाने तयार झालेले व अनेक आकड्यांची त्याला जोड दिलेले अकाऊंटस् टिष्ट्वटरने बंद केले होते.
धक्कादायक बाब अशी की फहादने जे टिष्ट्वटस् केले त्यापैकी एकामध्ये मोहम्मद साजिद उर्फ बाबा साजिद हा इंडियन मुजाहिदनचा माजी कार्यकर्ताही गेल्यावर्षी इसिसमध्ये दाखल झाल्याचे म्हटले होते. गेल्या महिन्यात साजिद सिरियामध्ये ठार झाल्याचे सांगितले जाते. २००८ मध्ये देशात झालेल्या बाँबस्फोटांची चौकशी करीत असलेल्या नॅशनल इनव्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) साजिदची अटक होण्यास मदत होईल अशी माहिती देण्याऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.
@ू्रँंू्रि2 हे कव्हर म्हणून आयएसचा लोगो वापरते. त्यावरून झालेले टिष्ट्वट म्हणते की,‘मुशरीकिनच्या हातातून संपूर्ण भारत जिंकून घेतला जात नाही तोपर्यंत ही बोट थांबविली जाऊ शकणार नाही. आणि आम्ही ती सतत भरलेली असावी या साठी तुम्हाला निमंत्रित करीत आहोत.’’या टिष्ट्वटसोबत प्रसिद्ध टाकण्यात आलेल्या छायाचित्रांत दोन बोटींमध्ये डझनभर लोक त्यांच्या हातांतील शस्त्रे फिरवत असल्याचे दिसते.
दुसऱ्या एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, ‘त्यांच्यामध्ये असलेला एक जण इंडियन मुजाहिदीनच्या गटाचा माजी सिंहासारखा नेता असून तो इगेमसी इन कोबाने (अबू तुराब अल हिंदी) आहे. अबू तुराब अल हिंदी ही पदवी बाबा साजिद याला तो इसिसमध्ये दाखल झाल्यावर देण्यात आली होती. (इगेमसीचा अर्थ मृत्यू येईपर्यंत लढणारा) संघर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत तो माघारी येणार नाही.
फहादने १९ जुलै रोजी केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले होते की, इसिसचा भारतातून आलेला अतिरेकी अबु काका असल्याचे छायाचित्र टाकले होते. त्याने टिष्ट्वटमध्ये म्हटले होते की, अबु काका अल हिंदी हा भारतीय मुजाहीद आहे. गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही टिष्ट्वटर हँडलवर आमचे लक्ष असून ते बंद करण्याची आम्ही विनंती करणार आहोत.
इसिसमध्ये सत्तेचे वाटप
वॉशिंग्टन : इसिस वा इस्लामिक स्टेटस्चा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याने आपल्या हाती एकवटलेल्या सत्तेचे विकेंद्रीकरण आपल्या अंतर्गत वर्तुळात केले असून, बगदादी स्वत: वा कोणताही ज्येष्ठ नेता मरण पावला तरीही इसिसच्या लढ्यात कोणताही बदल होऊ नये अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Indian youth in Isis's new video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.