भारतीय देत आहेत अमेरिकेत भरमसाट रोजगार! कसं? ही आकडेवारी पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 10:46 AM2022-08-23T10:46:30+5:302022-08-23T10:46:45+5:30

१ अब्ज डॉलर किंवा त्याहून अधिकच्या मूल्याची अमेरिकेतील निम्म्याहून अधिक स्टार्ट-अप्स (५८२ पैकी ३१९ किंवा ५५ टक्के) स्थलांतरितांनी स्थापन केली आहेत.

Indians are giving huge jobs in America how Check out these statistics | भारतीय देत आहेत अमेरिकेत भरमसाट रोजगार! कसं? ही आकडेवारी पाहा...

भारतीय देत आहेत अमेरिकेत भरमसाट रोजगार! कसं? ही आकडेवारी पाहा...

googlenewsNext

१ अब्ज डॉलर किंवा त्याहून अधिकच्या मूल्याची अमेरिकेतील निम्म्याहून अधिक स्टार्ट-अप्स (५८२ पैकी ३१९ किंवा ५५ टक्के) स्थलांतरितांनी स्थापन केली आहेत. यात भारतीय लोक सर्वात आघाडीवर असून, त्यांच्याकडून ६६ कंपन्या चालवल्या जात आहेत. इस्त्रायल ५४ कंपन्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

कुणाचे सर्वाधिक योगदान? 
६६ भारत 
५४ इस्त्रायल 
२७ ब्रिटन
२२ कॅनडा
२१ चीन
१८ फ्रान्स
१५ जर्मनी
११ रशिया
१० युक्रेन
८ इराण

या देशांचा समावेश
ब्रिटन, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, रशिया, युक्रेन, इराण, ऑस्ट्रेलिया, रोमानिया, नायजेरिया, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, अर्जेंटिना आणि इतर अनेक देशांनीदेखील अमेरिकेत स्टार्ट-अप सुरू केली आहेत. 

दोन किंवा अधिक युनिकॉर्न स्थापन करणारे संस्थापक
इलॉन मस्क (द. आफ्रिका), मोहित आरोन (भारत), ज्योती बन्सल (भारत), आशुतोष गर्ग (भारत), अजित सिंग (भारत)

अल गोल्डस्टीन उझबेकिस्तान
नुबर अफेयन, लेबनॉन । इग्नासियो मार्टिनेझ, स्पेन
आयन स्टोइका, रोमानिया । सेबॅस्टियन थ्रुन, जर्मनी

कंपन्या किती मोठ्या । अब्ज डॉलरमध्ये
स्पेसएक्स- १२५
स्ट्राइप- ९५
इन्स्टाकार्ट- ३९
डेटाब्रिक्स- ३८
एपिक गेम्स- ३१.५
मिरो- १७.५
डिस्कॉर्ड- १५ 

Web Title: Indians are giving huge jobs in America how Check out these statistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.