25 दिवसांपुर्वी अमेरिकेत गेलेल्या भारतीयाची गोळ्या घालून हत्या
By admin | Published: April 8, 2017 12:42 PM2017-04-08T12:42:47+5:302017-04-08T12:50:21+5:30
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे एका 26 वर्षीय भारतीय तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 8 - अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे एका 26 वर्षीय भारतीय तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. दोन बुरखाधारी सशस्त्र हल्लेखोरांनी हा हल्ला केला. गुरुवारी याकिमा सिटीमधील एएम-पीएम गॅस स्टेशनजवळील एका दुकानात ही घटना घडली. हत्या करण्यात आलेल्या भारतीय तरुणाचं नाव विक्रम जारयाल असून तो या दुकानात क्लर्क म्हणून काम करत होता. हे दुकान त्याच्या मित्राचे आहे.
घटना घडली तेव्हा विक्रम दुकानाच्या काऊंटवर बसला होता. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दोन बुरखाधारी दुकानात पोहोचले आणि लूट करण्यास सुरुवात केली. यावेळी हल्लेखोरांनी विक्रमच्या छातीत गोळ्या घातल्या. हा हल्ला वर्णद्वेषातून झाला नसल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विक्रम 25 दिवसांपुर्वीच अमेरिकेत आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी मागणी केल्यानंतर विक्रमने काऊंटरवर असलेले सर्व पैसे दिल्यानंतरही गोळी चालवण्यात आली. विक्रमला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विक्रम पंजाबच्या होशियारपूरचा राहणारा असून एक महिन्यापूर्वी अमेरिकेत गेला होता अशी माहिती त्याच्या भावाने दिली आहे.
विक्रमच्या भावाने ट्विट करत या घटनेची माहिती केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना देत मृतदेह भारतात परत आणण्यासाठी मदत मागितली. शुक्रवारी सुषमा स्वराज यांनी ट्विटची दखल घेत "तुमच्या भावाच्या निधनावर मी शोक व्यक्त करते. अमेरिकेतील भारतीय दुतावासाला शक्य तेवढी मदत करण्याचा आदेश दिला आहे", अशी माहिती दिली.
I have received a report on the shootout incident resulting in the tragic death of Indian national Vikram Jaryal in Washington State USA./1
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) April 8, 2017
We are coordinating with the investigative agencies. They have got the CCTV footage and are in the process of apprehending the culprits. /4
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) April 8, 2017
पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. दुकानात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही सर्व घटना कैद झाली आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहे. "पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा विक्रम जिवंत होता. त्याने पोलिसांना संपुर्ण घटना सांगितली. पण रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला", अशी माहिती एका पोलिसाने दिली आहे.
22 फेब्रुवारी रोजी कॅनसस शहरात एका अमेरिकी नागरिकाने भारतीय इंजिनीअर श्रीनिवास कुचीभोटला (32) यांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर अमेरिकेतील भारतीयांमध्ये खळबळ माजली गोली. यावेळी आमच्या देशातून चालते व्हा ; अतिरेक्यांनो, असे हल्लेखोर म्हणत होता. माजी नेमबाज एडन पुरिनतोन (51) याने हा गोळीबार केला. त्याचा आणि या इंजिनीअरचा वर्णद्वेषावरुन वाद झाला होता. या हल्ल्यात अन्य एक भारतीय व त्यांचा सहकारी अलोक मदसानी हे गंभीर जखमी झाले आहेत.
हल्ल्यांचे सत्र -
भारतीय इंजिनिअर श्रीनिवास कुचिभोटला (३२) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर लँकस्टरमध्ये भारतीय वंशाचे हरनिश पटेल (४३) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर दीप राय (३९) यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.