‘भारताचे कृषी क्षेत्र गतिमान बनू शकते’
By admin | Published: August 28, 2015 11:49 PM2015-08-28T23:49:01+5:302015-08-28T23:49:01+5:30
भारताकडे कृषी क्षेत्राला गतिमान बनविण्याची अपार क्षमता असल्याचा दावा करताना अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळाने अन्नप्रक्रिया उद्योगात थेट विदेशी गुंतवणूक वाढण्यासाठी धोरणात
Next
वॉशिंग्टन : भारताकडे कृषी क्षेत्राला गतिमान बनविण्याची अपार क्षमता असल्याचा दावा करताना अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळाने अन्नप्रक्रिया उद्योगात थेट विदेशी गुंतवणूक वाढण्यासाठी धोरणात बदल
करावे लागतील, असे म्हटले.
नुकतेच हे शिष्टमंडळ भारताला भेट देऊन गेले. या भेटीसंदर्भातील निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिलचे (यूएसआयबीसी) हे शिष्टमंडळ दोन दिवसांच्या भारत भेटीवर होते.
मोनसॅन्टो इंडिया रिजनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा दिवेकर-नरुला यांनी ‘फूड अँड अॅग्रिकल्चर एक्झिक्युटिव्ह मिशन टू इंडिया’च्या समारोपात म्हणाले.