पुराव्याशिवाय भारताचे आरोप, पाकिस्तानच्या उलटया बोंबा
By admin | Published: September 24, 2016 12:24 PM2016-09-24T12:24:30+5:302016-09-24T12:35:55+5:30
उरीमधील भारतीय लष्कराच्या तळावर झालेला दहशतवादी हल्ला हा काश्मिरमधील अस्वस्थततेचा परिणाम असू शकतो असे वक्तव्य पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २४ - उरीमधील भारतीय लष्कराच्या तळावर झालेला दहशतवादी हल्ला हा काश्मिरमधील अस्वस्थततेचा परिणाम असू शकतो असे वक्तव्य पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केले आहे. उरी हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचा त्यांनी दावा केला.
भारत पुराव्याशिवाय बोलत आहे असा उलटा आरोप त्यांनी केला. उरी हल्ला काश्मीरमध्ये जो अत्याचार सुरु आहे त्याची प्रतिक्रिया असू शकते असे शरीफ म्हणाले. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनाला उपस्थित राहिल्यानंतर पाकिस्तानला निघालेले शरीफ काहीवेळ लंडनमध्ये थांबले होते. त्यावेळी पत्रकारपरिषदेत बोलताना त्यांनी हे आरोप केला.
आणखी वाचा
रविवारी पहाटे उरी येथील लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे १८ जवान शहीद झाले. या हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाचे सबळ पुरावे असून, भारताने ते पुरावे पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्याकडे सोपवले आहेत.
जानेवारीत पठाणकोटमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला करणा-या जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेनेच उरीमध्ये हल्ला घडवून आणला. भारत बेजबाबदारपणे वागत असून, तपासाशिवाय आरोप करत आहे असे उलटा आरोप शरीफ यांनी केला.