भारताचा जिगरी दोस्त, तुर्कीचा जानी दुश्मन...! ग्रीसने शक्तीशाली ड्रोन बनविला, जागेवरच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:02 IST2025-02-19T14:01:19+5:302025-02-19T14:02:14+5:30

Drone War Begins: तुर्कस्तानच्या बायरकतार ड्रोनने जगातील सर्वच देशांना धडकी भरविलेली आहे. कधी येईल आणि फडशा पाडून जाईल कोणालाच नेम नाहीय.

India's best friend, Turkey's sworn enemy...! Greece built a powerful drone ARCHYTAS II, on the spot... | भारताचा जिगरी दोस्त, तुर्कीचा जानी दुश्मन...! ग्रीसने शक्तीशाली ड्रोन बनविला, जागेवरच...

भारताचा जिगरी दोस्त, तुर्कीचा जानी दुश्मन...! ग्रीसने शक्तीशाली ड्रोन बनविला, जागेवरच...

तुर्कस्तानच्या बायरकतार ड्रोनने जगातील सर्वच देशांना धडकी भरविलेली आहे. कधी येईल आणि फडशा पाडून जाईल कोणालाच नेम नाहीय. बायरकतार लाँच झाल्यापासून जगातील ६० टक्के ड्रोन इंडस्ट्रीवर या कंपनीची सत्ता आहे. तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या जावयाच्या कंपनीचा हा ड्रोन आहे. परंतू, आता या ड्रोनलाही फाईट देऊ शकेल असा नवा ड्रोन तुर्कीच्या दुश्मन आणि भारताच्या मित्र देशाने तयार केला आहे. 

हा देश आहे ग्रीस. खरेतर तुर्कस्तान आणि ग्रीस हे दोन्ही देश नाटोचे सदस्य आहेत. परंतू, दोघेही एकमेकांचे कट्टर दुश्मनही आहेत. तुर्कीच्या बायरकतारच्या धोक्यामुळे ग्रीसला आपला ड्रोन असावा अशी गरज भासू लागली व याच्या निर्मितीला सुरुवात झाली. हेलेनिक एअरोस्पेस इंडस्ट्रीने या ARCHYTAS II ड्रोनची घोषणा केली आहे. मानवरहित आहेच सोबत व्हर्टिकल टेकऑफ आणि लँडिंगही करू शकतो. यामुळे तो तुर्कीच्या बायरकतार टीबी २ पेक्षा वेगळा ठरणार आहे. 

तुर्कीच्या ड्रोनला उड्डाण करण्यासाठी धावपट्टीची गरज लागते. परंतू, ग्रीसच्या ड्रोनला सामान्य ड्रोनप्रमाणे जागेवरूनच हवेत झेपावता येणार आहे. दोन्ही देशांदरम्यान अनेकदा युद्धाची परिस्थिती उद्भवलेली आहे. ग्रीसला तुर्कीच्या ड्रोन क्षमतेची चांगली जाणीव आहे.DEFEA 2023 संरक्षण प्रदर्शनादरम्यान ग्रीसने ARCHYTAS II ड्रोनचे प्रदर्शन केले. ड्रोनचे पंख सुमारे ६ मीटर आणि लांबी ४ मीटर आहे आणि ते ३० किलो वजनाच्या पेलोडसह उडू शकते. बॉम्बसोबतच मोर्टार आणि रॉकेटसारखी शस्त्रे देखील जोडता येऊ शकतात. 

हा ड्रोन सतत ९ तास हवेत उडत राहू शकतो. हा ड्रोन संरक्षण आणि टेहळणीसाठी देखील वापरता येणार आहे. तीन वर्षांतच ग्रीसने हा ड्रोन बनविला आहे. तर तुर्कीला १० वर्षे लागली होती. या वर्षाच्या अखेरीस हे ड्रोन विक्रीस उपलब्ध केले जाणार आहेत. सुरुवातीला ते ग्रीसच्या सैन्याला पुरविले जाणार आहेत. नंतर त्याचे व्यावसायीकरण केले जाणार आहे. यामुळे हा ड्रोन भारतालाही मिळण्याची शक्यता आहे. 

Web Title: India's best friend, Turkey's sworn enemy...! Greece built a powerful drone ARCHYTAS II, on the spot...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :warयुद्ध