चीनमध्ये होणा-या बैठकीवर भारताने घातला बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2017 10:48 PM2017-05-13T22:48:48+5:302017-05-13T22:50:28+5:30
भारताने चीनमध्ये उद्यापासून सुरु होणा-या "वन बेल्ट वन रोड" बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - भारताने चीनमध्ये उद्यापासून सुरु होणा-या "वन बेल्ट वन रोड" बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता ध्यानात घेऊन असे प्रकल्प झाले पाहिजेत असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. "वन बेल्ट वन रोड" या महत्वकांक्षी योजनेतंर्गत चीनने सीमा ओलांडून बंदर, रेल्वे आणि रस्ते मार्गाने जोडणीचे लक्ष्य ठेवले आहे.
सुशासन, आंतरराष्ट्रीय नियम, पारदर्शकता आणि समानतेने असे प्रकल्प झाले पाहिजेत. ज्या प्रकल्पामुळे कर्जाचा बोजा वाढेल, पर्यावरणाचे संतुलन बिघडेल असे प्रकल्प टाळले पाहिजेत असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
चीन-पाकिस्तान दरम्यान सीपीईसी प्रकल्पातील एका भागावर भारताचा तीव्र आक्षेप आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधून जाणा-या इकॉनॉमिक कॉरिडोअरला भारताचा विरोध आहे. पीओके भारताचा भाग असल्याने भारताने आक्षेप घेतला आहे.