जगात भारताची प्रतिमा सुधारतेय - नरेंद्र मोदी
By admin | Published: November 24, 2015 07:35 PM2015-11-24T19:35:38+5:302015-11-24T19:35:38+5:30
जगात भारताची प्रतिमा सुधारत असून प्रत्येक क्षेत्रात चांगली प्रगती होत आहे. तसेच आता भारतीयांचा मिजाज बदलत आहे. जे भारतीय आधी रेल्वेतील सीट सोडण्यासाठी
Next
>ऑनलाइन लोकमत
सिंगापूर, दि. २४ - जगात भारताची प्रतिमा सुधारत असून प्रत्येक क्षेत्रात चांगली प्रगती होत आहे. तसेच आता भारतीयांचा मिजाज बदलत आहे. जे भारतीय आधी रेल्वेतील सीट सोडण्यासाठी तयार नव्हते, ते आता सब्सिडी सोडत असून आत्तापर्यंत ४० लाख कुटुंबियांनी सब्सिडी सोडली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. सिंगापूरमध्ये आयोजित भारतीय नागरिकांना नरेंद्र मोदींनी यावेळी संबोधित केले.
नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही मुद्दे -
- सिंगापूर लिटल इंडिया आहे.
- भारतीय ज्या देशात जातील त्या देशातील लोकांमध्ये रुळतात.
- भारतीयांचा मिजाज बदलत आहे. जे भारतीय रेल्वेतील सीट सोडण्यासाठी तयार नव्हते, ते आता सब्सिडी सोडत आहेत. आत्तापर्यंत ४० लाख कुटुंबियांनी सब्सिडी सोडली आहे .
- पत्रकार खुप चतुर असतात, जेव्हा मी निवडणूक लढत होतो, तेव्हा देशाच्या नीती बद्दल कल्पना नाही म्हणत फिरुन-फिरुन त्याच ठिकाणी नेत होते. त्यावर मी म्हणालो, ना डोळे झाकून आणि ना डोळे दाखवून बोलणार तर जगाबरोबर डोळे लावून चर्चा करणार.
- भारतात आता नागरिकांचा विश्वास वाढला आहे. संपूर्ण जग बदलत आहे, भारतीय सुद्धा बदलत आहेत.
- माझ्या मते FDI म्हणजे फस्ट डेव्हलेप इंडिया आहे. १८ महिन्यात FDI मध्ये ४० टक्के वाढ झाली आहे.
- इतिहासातून प्रेरणा घेऊन वर्तमानात चांगले काम केल्यास उज्ज्वल भविष्य निर्माण होईल.
- गरीबांचे अश्रू पुसण्यासाठी तसेच तरुणांच्या आणि महिलांच्या सबलीकरणासाठी सरकार विकासकामांवर भर देत आहे.
- आम्ही १७५ गीगावॅट अपरंपरागत ऊर्जेच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत आहोत.