भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाने अमेरिकेची चिंता वाढवली

By admin | Published: March 27, 2016 01:14 PM2016-03-27T13:14:16+5:302016-03-27T13:14:16+5:30

भारताच्या बॅलेस्टीक क्षेपणास्त्र कार्यक्रमाबद्दल अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. बॅलेस्टीक क्षेपणास्त्राच्या चाचण्यांमुळे अण्विक स्पर्धेचा धोका वाढणार आहे.

India's missile program raises concern for US | भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाने अमेरिकेची चिंता वाढवली

भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाने अमेरिकेची चिंता वाढवली

Next

ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. २७ - भारताच्या बॅलेस्टीक क्षेपणास्त्र कार्यक्रमाबद्दल अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. बॅलेस्टीक क्षेपणास्त्राच्या चाचण्यांमुळे अण्विक स्पर्धेचा धोका वाढणार असून, प्रादेशिक शांततेवरही परिणाम होतो असे अमेरिकेने म्हटले आहे. कुठल्याही अण्विक आणि क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या कार्यक्रमाची आम्हाला चिंता वाटते. 
 
त्यामुळे अण्विक स्पर्धेचा धोका वाढतो असे अमेरिकेचे प्रवक्ते मार्क टोनर म्हणाले. भारताच्या बॅलेस्टीक क्षेपणास्त्र कार्यक्रमाबद्दल टोनर यांना विचारले असता त्यांनी आम्ही आमची चिंता भारताच्या कानावर घातली आहे असे सांगितले. 
 
भारताबरोबर आमची याविषयावर काय व्दिपक्षीय सविस्तर चर्चा झाली ते सांगू शकत नाही पण आम्ही आमची चिंता कानावर घातली असे टोनर यांनी सांगितले. भारताने अलीकडेच स्वदेशी बनावटीच्या अणवस्त्र वाहू के-४ क्षेपणास्त्राची चाचणी केली. त्यावर अमेरिकेने टीका केली आहे. भारताची अण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंतवर हे के-४ मिसाईल तैनात करण्यात येणार आहे. 
 

Web Title: India's missile program raises concern for US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.