भारतात मुस्लीमांची लोकसंख्या वाढतेय; अर्थमंत्र्यांचं अमेरिकेतील पत्रकारांना उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 12:54 PM2023-04-11T12:54:48+5:302023-04-11T12:55:59+5:30
मंत्री निर्मला सितारमण सध्या अमेरिका दौऱ्यावर असून तेथील पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महत्त्वाच्या विषयांवर भूमिका मांडली
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेला देश भारत आहे. त्यामुळेच, अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यावरुन भारताला दोष देणाऱ्यांना देशातील वस्तुस्थिती माहिती नाही, असे म्हणत केंद्रीय मंत्री निर्मला सितारण यांनी विदेशात भारताची बाजू भक्कमपणे मांडली. भारताबद्दल पाश्चिमात्य देशांमध्ये नकारात्मक मत निर्माण झाल्याचे सांगत सितारमण यांनी कणखरपणे सरकारची भूमिका मांडली. भारतात पाकिस्तानपेक्षा मुस्लीमांची संख्या अतिशय चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्री निर्मला सितारमण सध्या अमेरिका दौऱ्यावर असून तेथील पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महत्त्वाच्या विषयांवर भूमिका मांडली. पाश्चिमात्य देशात भारताबद्दल नकारात्मक वातावरण तयार केल्याचं म्हटलं. तसेच, याबद्दल उत्तर देताना, भारतात मुस्लिमांची संख्या वाढत असून जगातील भारत हा मुस्लीमांची संख्या असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. सन १९४७ च्या तुलनेत भारताची लोकसंख्या वाढत आहे. त्याचवेळी पाकिस्तानही निर्माण झाले, पण तेथील तुलनेत आज भारतातील अल्पसंख्यांकांची स्थिती उत्तम असल्याचं सितारमण यांनी स्पष्ट केलं.
पाकिस्तानात अल्पसंख्यांकांची लोकसंख्या घटत आहे, विशेष म्हणजे मुस्लीमांच्या लोकसंख्येवरही तेथे परिणाम जाणवत आहे. मात्र, भारतात मुसलमान आपला व्यवसाय करत आहेत. त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं जातंय, स्कॉलरशीप देण्यात येते आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, निर्मला सितारमण ह्या आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष आणि वर्ल्ड बँकेच्या वसंत बैठकींत भाग घेण्यासाठी भारताच्या राष्ट्रपती पदाच्या अनुषंगाने, दुसरी जी २० अर्थमंत्र्यांची आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविण्यासाठी अमेरिकेत पोहोचल्या आहेत. यावेळी, भारतात परदेशी गुंतवणूक वाढत असल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देताना म्हटले, याचं उत्तर गुंतवणूकदारांनाच विचारायला हवं.