भारताची प्रगती होते, मग आपली का नाही - डोनाल्ड ट्रम्प

By admin | Published: October 29, 2016 07:53 AM2016-10-29T07:53:05+5:302016-10-29T07:53:05+5:30

जर भारत 8 टक्के विकास दर घेऊन प्रगती करु शकतो तर मग अमेरिका का करु शकत नाही ? असा सवाल डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारला आहे

India's progress, then why not yours - Donald Trump | भारताची प्रगती होते, मग आपली का नाही - डोनाल्ड ट्रम्प

भारताची प्रगती होते, मग आपली का नाही - डोनाल्ड ट्रम्प

Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 29 - अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात सतत भारताचा उल्लेख होऊ लागला आहे. पुन्हा एकदा भारताच्या बहाण्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर निशाणा साधला आहे. जर भारत 8 टक्के विकास दर घेऊन प्रगती करु शकतो तर मग अमेरिका का करु शकत नाही ? असा सवाल डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारला आहे. 
 
बराक ओबामा यांच्यामुळे आर्थिक विकासाची गती मंदावली असल्याचं डोनाल्ड ट्रम्प बोलले आहेत. मॅनचेस्टमधील न्यू हॅम्पशायर येथील प्रचारसभेत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. प्रचारसभा सुरु होण्याच्या काही तासांपुर्वीच अर्थव्यवस्थेशी संबंधित आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. आकड्य़ांनुसार तिमाहीत 2.9 विकास दर असल्याचं सांगण्यात आलं होतं.
 
'ओबामा पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांच्या कार्यकाळात देशाचा आर्थिक विकासदर 3 टक्क्यांहून अधिक झालाच नाही,' असा टोला ट्रम्प यांनी लगावला. 'देश मोठा असल्याने जलदगतीने विकास करु शकत नाही असं मला सांगण्यात आलं आहे. पण भारतही मोठा देश असून, 8 टक्के विकास दर घेऊन वाटचाल करत आहेत,' असं डोनाल्ड ट्रम्प बोलले आहेत. 
 
'जर भारत इतक्या वेगाने पुढे जाऊ शकतो तर मग अमेरिका का नाही', असा सवाल डोनाल्ड ट्रम्प यांनी उपस्थितांना विचारला. ट्रम्प यांनी चीनचादेखील उल्लेख करत 6 ते 8 टक्के विकास दरासोबत प्रगती करत असल्याचं सांगितलं. 
 

Web Title: India's progress, then why not yours - Donald Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.