हवाई दलासाठी सशस्त्र ड्रोन्सची भारताची विनंती विचाराधीन : अमेरिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 04:53 AM2017-10-23T04:53:12+5:302017-10-23T04:55:57+5:30
हवाई दलासाठी सशस्त्र ड्रोन्सची भारताची विनंती अमेरिका विचारात घेत आहे. भारताने आपल्या सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाची मोहीम हाती घेतली असून, सशस्त्र ड्रोन्स मिळण्यासाठी विनंती केली होती.
वॉशिंग्टन : हवाई दलासाठी सशस्त्र ड्रोन्सची भारताची विनंती अमेरिका विचारात घेत आहे. भारताने आपल्या सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाची मोहीम हाती घेतली असून, सशस्त्र ड्रोन्स मिळण्यासाठी विनंती केली होती. भारताची ही विनंती विचारात घेतली जात आहे, असे वरिष्ठ प्रशासकीय अधिका-याने सांगितले.
हवाई दलाची संरक्षण क्षमता या ड्रोन्समुळे वाढेल. भारताने जनरल अॅटॉमिक्स प्रिडेटर सी अव्हेंजर विमानांसाठी या वर्षी अमेरिकेला विनंती केली होती. भारताला अशा ८० ते १०० ड्रोन्सची गरज असून, हा करार आठ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा असेल. २६ जून रोजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर प्रशासनाने भारताची विनंती विचारात घेतली आहे.