संबंध सुधारण्यासाठी भारताचा प्रतिसाद निराशाजनक - शरीफ
By admin | Published: October 21, 2015 01:55 PM2015-10-21T13:55:22+5:302015-10-21T13:55:36+5:30
संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानकडून प्रयत्न सुरु असून या प्रयत्नांवर भारताचा प्रतिसाद निराशाजनक आहे असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मांडले आहे.
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २१ - काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान संबंधामधील मुख्य अडचण असून व्दिवपक्षीय संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानच्या प्रयत्नांवर भारताचा प्रतिसाद निराशाजनक आहे असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मांडले आहे.
अमेरिका दौ-यावर असलेल्या नवाझ शरीफ यांनी अमेरिकेतील पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांना संबोधीत केले. यामध्ये त्यांनी तणावासाठी भारतालाच जबाबदार ठरवले. शरीफ म्हणाले, दोन्ही देशांमधील भांडणासाठी काश्मीर प्रश्न हा मुख्य मुद्दा आहे. शांतता निर्माण करण्यासाठी हा मुद्दा निकाली काढणे गरजेचे आहे. गेल्या अडीच वर्षात आम्ही पाकिस्तानमधील परिस्थितीत सुधारणा घडवली आहे असा दावाही त्यांनी केला आहे.