मोदींच्या दौर्याआधीच्या चर्चेसाठी भारताचे वरिष्ठ मुत्सद्दी अमेरिकेत
By admin | Published: September 9, 2014 04:24 AM2014-09-09T04:24:49+5:302014-09-09T04:24:49+5:30
नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्याआधी भारताचे वरिष्ठ मुत्सद्दी तेथील परराष्ट्र विभागाच्या अधिकार्यांसोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले आहेत.
Next
वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्याआधी भारताचे वरिष्ठ मुत्सद्दी तेथील परराष्ट्र विभागाच्या अधिकार्यांसोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले आहेत.
अमेरिकेच्या राजकीय प्रकरणाच्या उपमंत्री वेंडी शेरमन या संयुक्त सचिव विक्रम दोराईस्वामी व अमनदीप गिल यांच्यासोबत चर्चा करतील. दोरायस्वामी हे दक्षिण व मध्य आशियासाठी सहायक मंत्री निशा देसाई बिस्वाल यांच्याशी चर्चा करतील. बराक ओबामा मोदी यांना अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले आहे.