अमेरिकेतील शॉपिंग मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार; बंदुकधारी जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 08:22 AM2023-05-07T08:22:29+5:302023-05-07T08:25:14+5:30

आता शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. 

Indiscriminate shootings at shopping malls in America texas; The gunman was killed on the spot by the police, 9 injured | अमेरिकेतील शॉपिंग मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार; बंदुकधारी जागीच ठार

अमेरिकेतील शॉपिंग मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार; बंदुकधारी जागीच ठार

googlenewsNext

टेक्सास - अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील डलाश शहरात एक शॉपिंग मॉलमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. मॉलमध्ये एका बंदुकधारी व्यक्तीने अंधाधुंद गोळीबार केला, त्यामध्ये लहान मुलांसह ९ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला जागीच ठार केलंय. दरम्यान, यापूर्वीही अशीच घटना अमेरिकेत घडली होती. एका व्यक्तीने शेजारील घरात घुसून कुटुंबीयांवर गोळीबार केला होता. त्यानंतर, आता शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. 

डलास शहारातील पोलीस प्रमुख ब्रायन हार्वे यांनी मीडियाशी बोलताना म्हटले की, एका बंदुकधारी व्यक्तीने एकट्यानेच हा गोळीबार केला, प्रिमियम आऊटलेट मॉलच्याबाहेर हा गोळीबार सुरू असताना, एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला ठार केले. दरम्यान, पोलिसांनी या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा जाहीर केला नाही. मात्र, ९ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यात, लहान मुलांचाही समावेश आहे. 

मेडिकल सिटी सेंटरने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, त्यांच्या ट्रॉमा सेंटरमध्ये ९ जखमींवर उपचार सुरू आहेत. जखमींचे वय ५ वर्षे ते ६१ वर्षांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयानेही त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप सखोल माहिती दिली नाही. 

टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना शोक व्यक्त केला. तसेच, ही अतिशय त्रासदायक घटना असल्याचं म्हटलं. तसेच, राज्य सरकारच्यावतीने सर्वोतोपरी मतदसेवा सुरू करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. 

Web Title: Indiscriminate shootings at shopping malls in America texas; The gunman was killed on the spot by the police, 9 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.