भारत-इस्रायल मैत्रीत लपवण्यासारखे काही नाही
By admin | Published: November 15, 2016 02:08 AM2016-11-15T02:08:07+5:302016-11-15T02:08:07+5:30
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पूर्ण समर्थन देत असल्याचे इस्रायलचे राष्ट्रपती ऱ्युवेन रिवलिन यांनी सोमवारी येथे सांगितले
मुंबई/ दिल्ली : दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पूर्ण समर्थन देत असल्याचे इस्रायलचे राष्ट्रपती ऱ्युवेन रिवलिन यांनी सोमवारी येथे सांगितले. भारत आणि इस्रायल यांची मैत्री दीर्घ काळापासून असून, लपविण्याची गरज पडेल, अशी आमची मैत्री नाही, असेही ते म्हणाले.
रिवलिन हे द्विपक्षीय संबंधांना मजबुती देण्यासाठी आठ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. व्यापारी आणि शिक्षणतज्ज्ञ यांचे एक शिष्टमंडळ त्यांच्यासोबत आहे. गेल्या २० वर्षांतील एखाद्या इस्रायल राष्ट्रपतींचा हा पहिला भारत दौरा आहे. पॅलेस्टाइन मुद्द्यावर भारताशी मतभेद आहेत, पण भारत आणि इस्रायल यांच्यात दृढ होत असलेल्या संबंधावरही त्यांनी भाष्य केले.